Parliament Security Breach Case
Edited Image
नवी दिल्ली: 2023 च्या संसद सुरक्षा भंग प्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी या प्रकरणातील दोन आरोपी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना जामीन मंजूर केला आहे. दिल्ली पोलिसांनी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. तथापि, आता दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. या दोघांनी 2023 मध्ये लोकसभेत प्रवेश करून पिवळा धुर सोडून घोषणाबाजी केली होती.
50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका -
संसदेच्या सुरक्षेत त्रुटी असल्याच्या प्रकरणात आरोपी नीलम आझाद आणि महेश कुमावत यांना जामीन मंजूर करताना दिल्ली उच्च न्यायालयानेही अटी घातल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की नीलम आझाद आणि महेश कुमावत जामिनाच्या वेळी माध्यमांशी बोलणार नाहीत. यासोबतच ते सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाहीत. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद आणि न्यायमूर्ती हरीश वैद्यनाथन शंकर यांच्या खंडपीठाने दोघांनाही 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि त्याच रकमेच्या दोन जामीनदारांवर दिलासा दिला आहे.
हेही वाचा - Cloudburst in Himachal : हिमाचल प्रदेशात ढगफुटीचा कहर: १७ ठिकाणी ढगफुटी, १८ मृत्यू
दरम्यान, याअगोदर संसदेतील सुरक्षा त्रुटी प्रकरणातील आरोपींचा जामीन अर्ज कनिष्ठ न्यायालयाने फेटाळला होता. आरोपींनी कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. नीलम आझाद आणि महेश कुमावत यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने 21 मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. तथापी, पोलिसांनी या आरोपींना जामीन मंजूर करू नये, असा युक्तीवाद केला होता.
हेही वाचा - भारत बनवतोय अमेरिकेपेक्षाही धोकादायक बंकर-बस्टर बॉम्ब; काय आहे खासियत? जाणून घ्या
काय आहे नेमक प्रकरण?
13 डिसेंबर 2023 रोजी संसदेच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्याची एक मोठी घटना समोर आली होती. 2001 मध्ये संसदेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचाही हा दिवस होता. लोकसभेत शून्य प्रहरात सागर शर्मा आणि मनोरंजन डी यांनी गॅलरीतून सभागृहात उडी मारली. त्यांनी सभागृहात पिवळा गॅस सोडला आणि घोषणाबाजी केली. लोकसभेत उपस्थित असलेल्या खासदारांनी त्यांना नियंत्रित केले. त्याच वेळी, इतर दोन आरोपी अमोल शिंदे आणि नीलम आझाद यांनी संसदेच्या परिसराबाहेर रंगीत गॅस फवारला आणि घोषणाबाजी केली. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी ललित झा आणि महेश कुमावत या दोन अन्य आरोपींना अटक केली होती.