Monday, March 09, 2026 01:56:04 AM

Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिरात भक्तांना मिळणार ही खास सुविधा; 50 हजार भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

यामुळे दर्शन व्यवस्था अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे.

ayodhya ram mandir अयोध्या राम मंदिरात भक्तांना मिळणार ही खास सुविधा 50 हजार भाविकांसाठी मंदिर प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात दर्शनासाठी दररोज लाखो भाविकांची उपस्थिती पाहायला मिळत असून वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात येत आहे. याच अनुषंगाने राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने (Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra Trust) तर्फे मंदिर परिसरात अत्याधुनिक लॉकर रूम सुविधा सुरू करण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि सुलभ व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.

मंदिर परिसरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या या आधुनिक लॉकर केंद्रांमुळे आता एकाच वेळी सुमारे 50 हजार भाविकांना त्यांचे चप्पल, बूट, बॅग आणि इतर वैयक्तिक साहित्य सुरक्षित ठेवता येणार आहे. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या गर्दीमुळे सामान ठेवण्याची सोय अपुरी पडत होती, तसेच सुरक्षेबाबतही भाविकांमध्ये चिंता निर्माण होत होती. नव्या सुविधेमुळे दर्शन प्रक्रियेत अधिक शिस्त आणि सोय निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Epstein Files: गुगलवर 'एपस्टीन फाइल्स' सर्च करणं पडू शकतं महागात; अन्यथा...; सरकारने दिला गंभीर इशारा

लॉकर व्यवस्थेसाठी टोकन आधारित प्रणाली लागू करण्यात आली असून सामान जमा करणे आणि परत मिळवणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर प्रशिक्षित सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून भाविकांच्या वस्तूंची सुरक्षितता सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. गर्दी नियंत्रण आणि व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असल्याचे प्रशासनाचे मत आहे.

याशिवाय मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर शू-रॅक उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सुमारे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर अयोध्येत भाविकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने दर्शन व्यवस्था अधिक नियोजनबद्ध करण्यासाठी अशा सुविधा अत्यावश्यक ठरत आहेत.

राम मंदिर ट्रस्टशी संबंधित पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांना अधिक आरामदायी आणि सुरळीत दर्शन अनुभव देण्यासाठी पायाभूत सुविधा टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येत आहेत. नव्याने सुरू झालेली लॉकर सुविधा ही त्याच दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून भविष्यातही भाविकांच्या सोयीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी खुशखबर! खात्यात 'या' महिन्याचे पैसे जमा झाले का? लगेचच चेक करा


सम्बन्धित सामग्री