Tuesday, November 11, 2025 10:34:28 PM

OTT Films : 'या' आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी! ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'हे' चित्रपट होणार प्रदर्शित

डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि झी5 सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अ‍ॅनिमेटेड, सस्पेन्स थ्रिलर कंटेंट, कॉमेडी कंटेंट प्रदर्शित होणार आहेत.

ott films  या आठवड्यात प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हे चित्रपट होणार प्रदर्शित

मुंबई: ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात अनेक नवनवीन चित्रपट आणि वेब सिरीज प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी तयार आहेत. डिस्ने+हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओ आणि झी5 सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अ‍ॅनिमेटेड, सस्पेन्स थ्रिलर कंटेंट, कॉमेडी कंटेंट प्रदर्शित होणार आहेत. चला तर जाणून घेऊया कोणकोणते चित्रपट आणि वेब सिरीज पाहायला मिळणार आहेत.

भागवत चॅप्टर 1 राक्षस - भागवत चॅप्टर 1 राक्षस हा चित्रपट रहस्यमय आणि सस्पेंस-थ्रिलरने भरलेला आहे. या चित्रपटात अरशद वारसी आणि जितेंद्र कुमार मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात, अरशद वारसी पोलीस निरीक्षकची भूमिका साकारणार आहे जो गावातून हरवलेल्या मुलींचा शोध घेतो आणि एका रहस्यमयी शिक्षकाशी संबंधित भयावह रहस्यात फसतो. या चित्रपटात, जितेंद्र कुमार शिक्षकाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 17 ऑक्टोबर 2025 रोजी झी5 वर प्रदर्शित होणार आहे. 

फाइनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स (2025) - असं सांगितलं जातं की हा चित्रपट सर्वाधिक हॉरर चित्रपटांपैकी एक आहे. फाइनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी जियो हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट टोनी टॉडचा शेवटचा चित्रपट आहे. फाइनल डेस्टिनेशन: ब्लडलाइन्स चित्रपटात ब्रॅक बैसिंगर, रिचर्ड हारमन आणि इतर कलाकार महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. 

हेही वाचा: KBC Kid Controversy : 'आप रूल्स समजाने मत बैठना...'; केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्याशी उद्धट बोलणारा 'तो' मुलगा होतोय ट्रोल

आवर फॉल्ट - आवर फॉल्ट हा रोमॅंटिक-ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटात निकोल वॉलेस आणि गॅब्रिएल ग्वेरा मुख्य भूमिकेत आहेत. आवर फॉल्ट चित्रपटाचं दिग्दर्शन डोमिंगो गोन्झालेझने केला आहे आणि सोफिया कुएंका यांनी सह-लेखन केले आहे. हा चित्रपट 16 ऑक्टोबर रोजी अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.

सर्च द नैना मर्डर केस - 'सर्च द नैना मर्डर केस' हा चित्रपट रहस्यमय आणि सस्पेंस-थ्रिलरने परिपूर्ण आहे. या चित्रपटात कोंकणा सेन शर्मा मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 17 ऑक्टोबर रोजी जियो हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. 


सम्बन्धित सामग्री