Monday, November 17, 2025 05:42:54 AM

Richest Youtuber In India: भारतातील सर्वांत श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत 'हा' ठरला नंबर वन

भारतात असे काही यूट्यूबर्स आहेत जे त्यांच्या आकर्षक व्हिडिओंमुळे जगभर प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यासोबत त्यांची कमाई लाखांपेक्षा अधिक आहेत.

richest youtuber in india भारतातील सर्वांत श्रीमंत यूट्यूबर्सच्या यादीत हा ठरला नंबर वन

मुंबई: प्रसि्द्धी मिळवण्यासाठी बरेच लोक सोशल मीडियावर विशेषत: यूट्यूबवर विविध व्हिडिओ पोस्ट करतात. यामुळे, आजकाल बरेच लोक लोकप्रिय होत आहेत. इटकंच नाही, तर त्यांच्या व्हिडिओंना मोठ्या प्रमाणात लाईक्स, शेअर्स आणि सब्सक्राइबर्स मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार, एक लाख सब्सक्राइबरपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना यूट्यूबकडून रिवॉर्ड मिळतात आणि ते कमाई देखील करू लागतात. पण, तुम्हाला माहित आहे का? भारतात असे काही यूट्यूबर्स आहेत जे त्यांच्या आकर्षक व्हिडिओंमुळे जगभर प्रसिद्ध झाले आहेत आणि त्यासोबत त्यांची कमाई लाखांपेक्षा अधिक आहेत. चला तर जाणून घेऊया  ते प्रसिद्ध यूट्यूबर्स कोण आहेत. 

'हे' आहेत टॉप 5 श्रीमंत यूट्यूबर्स 

भूवन बाम: 2015 मध्ये भूवन बामने विविध प्रकारचे व्हिडिओ यूट्यूबवर पोस्ट करण्यास सुरुवात केली. भूवन बामने बीबी की वाइन्स नावाचे यूट्यूब पेज तयार केले, जिथे त्याने विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, त्याने अनेक जगप्रसिद्ध कलाकारांच्या हास्यविनोदक पद्धतीने मुलाखत घेतल्या, ज्यामुळे अनेकजण त्याच्यासोबत काम करू लागले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुवन बामची एकूण संपत्ती 122 कोटींपेक्षा अधिक आहे. 

कॅरीमिनाटी: यूट्यूबवर अजय नागर उर्फ कॅरीमिनाटीचे 4 कोटी  50 लाख पेक्षा अधिक सब्सक्राइबर्स आहेत. कॅरीमिनाटी त्याच्या अनोख्या अंदाजामुळे आणि विशेषत: यूट्यूब कंटेटमुळे जगभरात प्रसिद्ध झाला. सूत्रांनुसार कॅरीमिनाटीची एकूण संपत्ती 131 कोटींपेक्षा जास्त आहे.

हेही वाचा: Baahubali 3 Rumors vs Reality : बाहुबली चित्रपटाचा सिक्वल येणार?; 'बाहुबली: दी एपिक'च्या अखेरीस होणार खुलासा, प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

समय रैना: समय रैना एक प्रसिद्ध स्टॅंडप कॉमेडियन आणि यूट्यूबर आहे. त्याचा जन्म 26 ऑक्टोबर 1997 रोजी जम्मू शहरातील सीर हमदान अनंतनाग येथील सलिया भागातील एका सनातनी काश्मिरी पंडित कुटुंबात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कॉमेडियन समय रैनाची एकूण संपत्ती 140 कोटींहून अधिक आहे. 

टेक्निकल गुरुजी: टेक्निकल गुरुजी हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणारे एक प्रसिद्ध भारतीय यूट्यूबर आहेत. टेक्निकल गुरुजी उर्फ गौरव तिवारी त्याच्या यूट्यूबर चॅनेलवर तंत्रज्ञानाशी संबंधित व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी विशेषत: ओळखला जातो. असे सांगितले जाते की, टेक्निकल गुरुजींची एकूण संपत्ती 356 कोटी रुपये आहे. यूट्यूबवर टेक्निकल गुरुजींचे तब्बल 23.7 मिलियन सब्सक्राइबर्स आहेत.

तन्मय भट्ट: यूट्यूबर तन्मय भट्ट एक प्रसिद्ध स्टॅंडप कॉमेडियन आणि आणि यूट्यूबर आहे. भूवन बाम, कॅरीमिनाटी, समय रैना, टेक्निकल गुरुजी यांसारख्या अनेक यूट्यूबर्सना मागे टाकत तन्मय भट्ट श्रीमंत यूट्यूबरच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. तन्मय भट्टची एकूण संपत्ती 665 कोटींपेक्षा अधिक आहे.


सम्बन्धित सामग्री