मुंबई: आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेकजण वेगवेगळे व्यायाम, योगासने, डाएट चार्ट फॉलो करतात. यासह, काहीजण वजन कमी करण्यासाठी ब्लॅक कॉफी देखील पितात. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ब्लॅक कॉफी पिल्याचे अनेक फायदे आहेत. मात्र, दररोज ब्लॅक कॉफी पिणे खरंच फायदेशीर आहे का? चला तर सविस्तर जाणून घ्या.
तज्ञांच्या मते, ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन असते, जे उत्तेजक म्हणून कार्य करते. ब्लॅक कॉफी पिल्याने थकवा आणि वजन कमी होण्यास मदत होते. एका अभ्यासादरम्यान, असे आढळून आले की ब्लॅक कॉफी पिल्यामुळे स्मरणशक्ती सुधारते. तसेच, संशोधनानुसार असेही आढळून आले की, ब्लॅक कॉफी पिल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो आणि मूड सुधारतो. नैराश्याच्या लक्षणांवरही याचा सकारात्मक परिणाम होतो. रक्तदाब कमी करण्यासाठी आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी ब्लॅक कॉफी मदत करते.
हेही वाचा: Coconut & Castor Oil : मुलायम आणि मजबूत केसांसाठी कोणतं तेल फायदेशीर? नारळाचे तेल किंवा एरंडेल तेल? जाणून घ्या
मात्र दुसरीकडे, ब्लॅक कॉफी पिण्याचे काही तोटे देखील आहेत. जास्त कॉफी पिल्याने झोप येण्यास अडथळा येऊ शकतो. विशेषतः जर रात्रीच्या दरम्यान ब्लॅक कॉफी पिल्याने स्वस्थता, चिडचिड आणि कधीकधी उच्च रक्तदाब होण्याचीही शक्यता असते. यासह, काही लोकांना ब्लॅक कॉफी पिल्यामुळे अॅसिडिटी, पोटदुखी किंवा अपचनाचा त्रास होतो. ब्लॅक कॉफी पिण्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. याशिवाय, दातांवर डाग पडणे ही देखील एक सामान्य समस्या आहे.
तज्ञांच्या मते, ब्लॅक कॉफी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र, जास्त प्रमाणात ब्लॅक कॉफी पिणे टाळावे. दिवसातून दोन ते तीन कप ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर आहे. मात्र, जर तुम्हाला आरोग्य संबंधी काही समस्या असतील, तर ब्लॅक कॉफी पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)