मुंबई: मुंबईत अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे आहेत. शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अनेक बॉलिवूड कलाकारांची घरे पाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यांच्या घरातील संरचना, सजावट, इत्यादी. पाहून अनेकजण थक्क होतात. या घरांना पाहिल्यावर अनेकजण मुंबईत स्वत:चं घर घेण्याचं स्वप्न पाहतात. पण तुम्हाला माहित आहे का? बॉलिवूडमध्ये एक ज्येष्ठ अभिनेत्री आहे, ज्या शाहरुख आणि सलमान खानच्या घराजवळ म्हणजेच वांद्रे पश्चिम येथील बॅंडस्टॅंड परिसरात राहतात. मात्र, खूप कमी लोकांनाच 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीचं घर माहित आहे. चला तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Mrs Universe 2025 : शेरी सिंगने इतिहास घडवला! 'मिसेस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धे'चा किताब पटकवणारी ठरली पहिली भारतीय महिला
ही ज्येष्ठ अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून रेखा आहे. आज रेखा यांचा 71 वा वाढदिवस आहे. अभिनेत्री रेखा यांचं घर वांद्रे पश्चिम येथील बॅंडस्टॅंड परिसरात आहे. या घराचं नाव आहे 'बसेरा'. हा बंगला समुद्रकिनाऱ्यासमोर आहे. या बंगल्याची संरचना खूप सुंदर आहे. या बंगल्याच्या आजूबाजूला हिरवळ झाडे आहेत, ज्यामुळे या बंगल्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं. हा बंगला एखाद्या राजवाड्यासारखा दिसतो. मिळालेल्या माहितीनुसार, 'बसेरा' बंगल्याची किंमत जवळपास 100 कोटींच्या घरात आहे. या राजेशाही बंगल्यात प्रवेश करताना तुम्हाला निळ्या रंगाच्या छत्रीच्या आकाराची रचना पाहायला मिळेल, जी बंगल्याची शोभा वाढवते. ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांचा 'बसेरा' हा बंगला खूप लक्षवेदी आहे. या बंगल्यात अनेक सुखसुविधा आहेत. असं सागितलं जातं की, 'बसेरा' या बंगल्यात रेखा एकट्याच राहतात. रेखा यांचं घर शाहरुख आणि सलमान खानच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे. या घरात कोणालाही येण्याची परवानगी नाही. मात्र, काही ठराविक लोकंच या घरात प्रवेश करू शकतात.