Sunday, February 16, 2025 11:36:43 AM

Champions Trophy Squads
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर संघ जाहीर

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघ जाहीर करण्याची शेवटची तारीख येत आहे जवळ

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर संघ जाहीर

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपली आहे. पण, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अवतीभवती बरेचसे प्रश्न रेंगाळत आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार की नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. पाकिस्तान हवी तशी सुरक्षा खेळाडूंना आणि संघांना देऊ शकेल का ? या प्रश्नाचं उत्तर आयसीसीला अजूनही मिळालेलं नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीला सुरु होणार आहे आणि मैदानांचा बांधकाम अद्यापही पूर्ण झालेलं नाही. 

भारताने आपले सर्व सामने दुबईमध्ये स्थलांतर करून घेतले आहेत. जर भारत उपांत्य किंवा अंतिम फेरीत पोहचला तर हे सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार आणि जर भारत संघ साखळी फेरीतच बाहेर पडला तर हे सामने पाकिस्तानमध्ये होणार. 

या सर्व घडामोडींमध्ये ५ देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. 
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश संघांनी आपले संघ जाहीर केले आहेत. 
 
ऑस्ट्रेलिया संघ 
पॅट कमिन्स (कर्णधार), ॲलेक्स कॅरी, नॅथन एलिस, ॲरॉन हार्डी, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, ॲडम झाम्पा

न्यूझीलंड संघ 
मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ'रुर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, बेन सियर्स, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग

दक्षिण आफ्रिका संघ 
टेम्बा बावुमा (कर्णधार), टोनी डी झोर्झी, मार्को येनसेन, हेन्री क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉरकिया, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी वेन डर डसन 

अफगाणिस्तान संघ 
हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमत शाह (उपकर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), इब्राहिम झादरान, सेदीकुल्ला अटल, अजमतुल्ला उमरझाई, मोहम्मद नबी, गुलबदीन नाईब, रशीद खान, एम गझनफर, नूर अहमद, फजलहक फारुकी, नाविद झादरान आणि फरीद अहमद मलिक

बांगलादेश संघ 
नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), तौहीद हृदयॉय, सौम्या सरकार, तन्झिद हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, मेहिदी हसन मिराज, रिशाद हुसैन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेज हुसेन, नसुम अहमद, तनजीम हसन, नासुम हसन, नाहीद राणा.


सम्बन्धित सामग्री