Tuesday, November 18, 2025 09:22:13 PM

Sachin Tendulkar News : सचिन तेंडुलकरने 'या' कंपनीत पैसे गुंतवल्याच्या अफवांमुळे शेअरमध्ये 13000 टक्क्यांची वाढ; अधिकृत स्पष्टीकरण समोर

क्रिक्रेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने कंपनीत गुंतवणूक केल्याच्या अफवांमुळे एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरच्या किंमतीत तब्बल 13 हजार टक्क्यांची वाढ झाली आहे.

sachin tendulkar news  सचिन तेंडुलकरने या कंपनीत पैसे गुंतवल्याच्या अफवांमुळे शेअरमध्ये 13000 टक्क्यांची वाढ अधिकृत स्पष्टीकरण समोर

मुंबई: क्रिक्रेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने कंपनीत गुंतवणूक केल्याच्या अफवांमुळे एका स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरच्या किंमतीत तब्बल 13 हजार टक्क्यांची वाढ झाली आहे. आता या अफवांना थांबवण्यासाठी आरआरपी सेमिकंडक्टर लिमिटेडने (RRP Semiconductor Ltd.) स्टॉक एक्स्चेंजला अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. कंपनीने स्पष्ट केलं आहे की, सचिन तेंडुलकरने कंपनीत कधीही गुंतवणूक केलेली नाही, तो शेअरधारक नाही, तसेच, बोर्ड सदस्य, सल्लागार किंवा ब्रॅंड ॲम्बेसेडर म्हणूनही त्याचा कंपनीशी कोणताही संबंध नाही. 

हेही वाचा: Gautam Gambhir: गौतम गंभीरचा खळबळजनक दावा: म्हणाला, ‘गिलच्या नेतृत्वाखाली भारताने…

गेल्या दहा महिन्यात कंपनीच्या शेअरची किंमत 10 रुपयांवरून थेट 9 हजार रुपयांपर्यंत पोहोचली. कंपनीचा असा विश्वास आहे की, ही वाढ अफवा आणि चुकीच्या माहितीमुळे झाली आहे. आरआरपी सेमिकंडक्टर लिमिटेडने सांगितले की, त्यांच्या आर्थिक स्थितीने अशा वाढीला कोणताही आधार नाही. एफवाय25 मध्ये कंपनीचा महसूल 31.59 कोटी रुपये, तर निव्वळ नफा 8.4 कोटी रुपये होता. मागील वर्षी कंपनीला केवळ 38 लाख महसूल आणि 1.7 लाखांचा तोटा झाला होता. सध्या प्रवर्तकांकडे फक्त 1.28 टक्के हिस्सा, तर 98.72 टक्के हिस्सा सार्वजनिक शेअरधारकांकडे आहे. कंपनीच्या बहुतेक शेअर्सवर 31 मार्च 2026 पर्यंत 'लॉक इन पीरियड' लागू आहे. कंपनीचा असा दावा आहे की, काही व्यक्तींनी या शेअर्सचा अनैतिक वापर करून व्यापार करत आहेत आणि त्यामुळे क्रिक्रेटपटू सचिन तेंडुलकरांची बदनामी होत आहे. त्यामुळे, कंपनीने या प्रकरणात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.


सम्बन्धित सामग्री