Tuesday, November 11, 2025 10:58:32 PM

Double Decker Bus In Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! तब्बल तीन दशकानंतर पुण्यात धावणार डबल डेकर बस

double decker bus in pune  पुणेकरांसाठी आनंदाची बातमी तब्बल तीन दशकानंतर पुण्यात धावणार डबल डेकर बस

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुण्यात वाहतूक समस्यांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे, प्रवाशांना 10 मिनिटांचा रस्ता गाठण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तासांचा कालावधी लागतो. अशातच, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडद्वारे (PMPML) इलेक्ट्रीक आणि वातानुकूलित नवीन डबल-डेकर बसच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत. जवळपास तीन दशकानंतर पुण्याच्या रस्त्यांवर डबल-डेकर बस धावणार आहे. त्यामुळे, प्रवाशांचा प्रवास अधिक सोप्पा होणार आहे. याोबतच, पुण्यातील वाहतूक कोंडी समस्याही कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा: Mumbai OneTicket: पंतप्रधान मोदींनी लाँच केले ‘मुंबई वनटिकट’ अॅप! आता मुंबईत बस, ट्रेन आणि मेट्रोने प्रवास करणे सोपे होणार

डबल डेकर बसचे वैशिष्ट्य 

ही डबल डेकर बस पूर्णपणे वातानुकूलित आहे. यासह, डबल डेकर बसमध्ये एका वेळी 65 प्रवासी बसू शकतात आणि 20 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे, ही बस पर्यावरणपूरक आहे. तसेच, या डबल डेकर बसमधून प्रवास केल्यामुळे प्रदूषण कमी प्रमाणात होईल. 

पुण्यातील 'या' रस्त्यांवर होणार डबल डेकर बसच्या चाचण्या

मगरपट्टा-कल्याणी नगर, रामवाडी मेट्रो स्टेशन-आंतरराष्ट्रीय टेक्निकल पार्क (खराडी), पुणे रेल्वे स्टेशन-पुणे विमानतळ, देहू-आळंदी, चिंचवड-हिंजवडी तसेच, हिंजवडी ते हिंजवडी वर्तुळाकार मार्गांवर डबल डेकर बसच्या चाचण्या होणार आहेत. 

डबल डेकर बसबाबत बोलताना पीएमपीएमएलचे मुख्य वाहतूक व्यवस्थापक सतीश गव्हाणे म्हणाले की, 'ऑपरेशन सुरू झाल्यानंतर तिकीटदरांच्या किंमती 100 रुपयांनी कमी होईल. सध्या चाचणी यशस्वी झाली आहे. आमचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे हे वरच्या डेकमध्ये अडथळा आणणाऱ्या झाडांच्या फांद्या यांसारख्या किरकोळ समस्यांबाबत पुणे महानगरपालिका आणि पुणे विकास प्राधिकरणाला पत्र सादर करतील'. लवकरच डबल डेकर बसच्या चाचण्या यशस्वी पूर्ण झाल्यानंतर लवकरच ती पुण्यातील प्रवाशांसाठी सुरू केली जाईल. तसेच, डबल डेकर बसमधून प्रवास करण्यासाठी प्रवाशांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. 


सम्बन्धित सामग्री