Friday, November 07, 2025 02:17:33 PM

Seeds Health Benefits: निरोगी आणि बळकट शरीरासाठी 'या' बियांचे सेवन ठरतील लाभदायक

निरोगी शरीरासाठी तसेच प्रोटिन, व्हिटॅमिन आणि अनेक गोष्टी गरजेचे असल्याने बरेचजण पौष्टिक आहारांचे सेवन करतात. अनेकजण हिरव्या फळभाज्या, ड्रायफ्रुट्स आणि विविध फळांच्या बिया देखील खातात.

seeds health benefits निरोगी आणि बळकट शरीरासाठी या बियांचे सेवन ठरतील लाभदायक

मुंबई: निरोगी शरीरासाठी तसेच प्रोटिन, व्हिटॅमिन आणि अनेक गोष्टी गरजेचे असल्याने बरेचजण पौष्टिक आहारांचे सेवन करतात. अनेकजण हिरव्या फळभाज्या, ड्रायफ्रुट्स आणि विविध फळांच्या बिया देखील खातात. जर या पौष्टीक आहारांचे योग्य प्रमाणात सेवन केले, तर शरीरासाठी आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. नुकताच, एम्स, हार्वड आणि स्टॅनफोर्डमधून प्रशिक्षण घेतलेले गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी वेगवेगळ्या बियांचे कोणकोणते फायदे आहेत? याबाबतची माहिती दिली. या बियांचे सेवन आपल्या शरीरासाठी कशाप्रकारे फायदेशीर ठरू शकतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Egg Yolk Myths: पिवळा की पांढरा? अंड्यातील कोणता भाग जास्त फायदेशीर; जाणून घ्या

 पौष्टिक आहारासाठी 'हे' आहेत फायदेशीर बिया

बडीशेप: गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बडीशेपमध्ये फायबर, व्हिटॅमिन आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे, पोट साफ होण्यास मदत होते आणि पचनक्रिया चांगली होते. बडीशेपचे नियमित सेवन केल्याने गॅस, विष्ठा आणि पोटासंबंधी समस्या सोडविण्यासाठी मदत करते. 

जवस: हार्मोन्स संतुलित करण्यासाठी जवसचे बियाणे खूप फायदेशीर आहे. मासिक पाळीदरम्यान आणि मेनोपॉजदरम्यान होणाऱ्या त्रासांना संतुलित करण्यासाठी जवसच्या बिया खूप उपयोगी आहे. 

चिया: चियामध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असतात, ज्याचे सेवन केल्याने हृदय आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. पेशींना मजबूत करण्यासाठी आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी चियाच्या बियांचे सेवन करणे लाभदायी असते. 

भोपळाच्या बिया: शरीराला शक्ती आणि उर्जा देण्यासाठी भोपळाच्या बिया खाणे खूप उपयोगी असते. भोपळाच्या बियांचे नियमित सेवन केल्याने थकवा कमी होतो आणि दिवसभर उर्जावान राहते. 

मेथीचे दाणे: मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. मधुमेहांच्या रुग्णांसाठीही मेथीच्या दाण्याचे सेवन करणे फायदेशीर मानले जातात. सोबतच, इन्सुलिनची पातळी संतुलित करण्यासाठी मदत करतात. 

हाडांच्या मजबुतीसाठी तिळ: तिळांमध्ये कॅल्शियम आणि इतर मिनरल्स मोठ्या प्रमाणात असतात, ज्यामुळे हाडांच्या मजबूतीसाठी आणि पायांच्या सांध्याला संतुलित ठेवण्यास मदत करते. डॉ, सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील बियांचे नियमित सेवन करणे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. या बियांना तुमच्या पौष्टिक आहारात समावेश केल्याने शरीर बळकट राहते. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री