Important documents In Car
Edited Image
केंद्र सरकारने वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी काही बदल केले आहेत. केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंडाची रक्कम वाढवली आहे. सरकारने वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलच्या दंडाची रक्कम 10 पटीने वाढवण्यात आली आहे. तथापि, हे बदल लोकांचे खिसे रिकामे करण्यासाठी नव्हे तर, जास्तीत जास्त लोकांना वाहतूक नियमांचे पालन करता यावे म्हणून करण्यात आले आहेत. पण आता नवीन नियमानुसार, जर तुम्ही प्रदूषण प्रमाणपत्र जवळ ठेवले नाही तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
प्रदूषण प्रमाणपत्र म्हणजे काय?
गाडी चालवताना हे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक आहे, जर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र नसेल तर तुमच्याकडून मोठा दंड आकारला जाईल. हे प्रमाणपत्र तुमचे वाहन पर्यावरणासाठी निश्चित केलेल्या मानकांनुसार प्रदूषण करत नसल्याचे सर्टिफिकेट असते.
हेही वाचा - पंतप्रधान मोदींचे 2 वर्षांत 38 परदेश दौरे अन् 258 कोटींचा खर्च! जाणून घ्या, कोणता दौरा होता सर्वात महागडा
PUCC नसल्यास भरावा लागणार मोठा दंड -
जर तुम्ही प्रदूषण प्रमाणपत्राशिवाय गाडी चालवत असाल तर आता 1000 रुपयांच्या दंडाऐवजी तुम्हाला 10 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. याचा अर्थ असा की ग्राहकांकडून थेट 10 पट चलन आकारले जाईल. अशा परिस्थितीत, हे प्रमाणपत्र नेहमी तुमच्याकडे ठेवावे लागेल. मोटार वाहन कायद्यांतर्गत, या नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल फक्त चलनाची तरतूद नसून यासाठी तुम्हाला 6 महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.
हेही वाचा - आता सौरऊर्जा, जलविद्युत आणि अणुऊर्जेवर धावणार ट्रेन; जाणून घ्या, कसा आहे भारतीय रेल्वेचा 'फ्यूचर प्लॅन'
पीयूसीसीची वैधता -
तुम्ही हे प्रमाणपत्र ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही प्रकारे बनवू शकता. या प्रमाणपत्राची वैधता एक वर्षासाठी राहते. तथापि, हे वेगवेगळ्या शहरांनुसार बदलू शकते.
पीयूसीसी बनवण्यासाठी किती खर्च येतो?
प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र बनवण्यासाठी लागणारी रक्कम वेगवेगळी असते. दुचाकी वाहनांसाठी, देयक रक्कम 60०-100 रुपयांच्या दरम्यान असू शकते. चारचाकी वाहनासाठी द्यावी लागणारी रक्कम 100-200 रुपयांपर्यंत असू शकते.