Thursday, January 22, 2026 03:21:53 AM

Mumbai Local Mega Block: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

विशेषतः ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रशासनाने कठोर निर्णय घेतला असून, या मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

mumbai local mega block मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी उद्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

Mumbai Local Mega Block : मुंबई आणि उपनगरातील लोकल प्रवाशांसाठी उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर विविध अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असून, घराबाहेर पडण्यापूर्वी मेगाब्लॉकचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. विशेषतः ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रशासनाने कठोर निर्णय घेतला असून, या मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. ठाणे ते वाशी/नेरूळ दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी अडचण येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - Raj Thackeray on Devendra Fadnavis : मुलं बेपत्ता होण्याच्या प्रमाणात 30 टक्के वाढ; राज ठाकरेंचे फडणवीस सरकारला खडेबोल, विरोधकांनाही सुनावलं

जलद आणि धीम्या लोकल एकाच मार्गावरून चालवण्यात येणार

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. या कालावधीत जलद लोकल धीम्या मार्गावरून धावतील. त्यामुळे जलद आणि धीम्या लोकल एकाच मार्गावरून चालवण्यात येणार असून, वेळापत्रक विस्कळीत होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेवरही मेगाब्लॉकचा फटका बसणार आहे. बोरिवली ते गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या काळात धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, ब्लॉकदरम्यान बोरिवली स्थानकावरील फलाट क्रमांक 1 ते 4 पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.

हेही वाचा - Mumbai Girl Missing Case : भयंकर! मायानगरी मुंबईत बेपत्ता मुलींचे 1,187 गुन्हे दाखल; 10 महिन्यांचा धक्कादायक आकडा समोर

दरम्यान, तिन्ही मार्गांवर एकाच दिवशी मेगाब्लॉक असल्याने लाखो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. लोकल सेवा काही काळ बंद राहणार असल्याने प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, तसेच प्रवासाचे योग्य नियोजन करूनच घराबाहेर पडावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री