ऑस्ट्रेलिया: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे इंटरनॅशनल सामना रविवार, 19 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून ऑस्ट्रेलिया देशातील पर्थ स्टेडियममध्ये सुरू आहे. यावेळी, शुभमन गिल भारतीय संघाचा कर्णधार आहे आणि मिशेल मार्श ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार आहे. तब्बल 224 दिवसानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा मैदानात उतरल्यामुळे चाहत्यांचा उत्साह द्विगुणीत झाला आहे.
सकाळी 8:34 वाजता, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे इंटरनॅशनल सामन्यात टॉस करण्यात आला. यादरम्यान, ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकल्यानंतर, कर्णधार मिशेल मार्शने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे इंटरनॅशनल सामना सकाळी 9 वाजता सुरू झाला असून कर्णधार शुभमन गिल आणि माजी कर्णधार रोहित शर्मा बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरले. यादरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटपटू मिशेल स्टार्कने पहिली ओव्हर टाकली. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वन-डे इंटरनॅशनल सामन्यादरम्यान, एक मोठी अपडेट समोर आली आहे.
हेही वाचा: Jai Shah On Afgan criketers Death : अफगाण खेळाडूंच्या मृत्युवर जय शाह संतापले, पोस्ट करत म्हणाले, 'निरर्थक हिंसाचारामुळे...'
तब्बल सात महिन्यानंतर क्रिक्रेटच्या मैदानात पुनरागमन करणारा रोहित शर्माला जोश हेजलवूडने फक्त 8 धावांवर बाद केले. चार षटकानंतर भारतीय संघाने 14 धावा केले आणि 1 विकेट गमावले. यादरम्यान, भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. क्रिक्रेटप्रेमींना विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होती, मात्र मिशेल स्टर्कने विराट कोहलीला बाद केले. त्यामुळे, रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहलीचे पुनरागमन देखील अपयशी ठरले. मिळालेल्या माहितीनुसार, 7 षटकांत 2 फलंदाज गमावून भारतीय संघाने 24 धावा केल्या होत्या. मॅचदरम्यान, ऑस्ट्रेलियन क्रिक्रेटर नॅथन एलिसने शुभमन गिलला 10 धावांवर बाद केले. त्यामुळे, भारतीय क्रिक्रेटप्रेमींना उत्साह कमी झाल्याचे दिसले.