मुंबई: भारतातील प्रमुख टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ नेहमीच चर्चेत राहते. देशभरातील 490 मिलियनपेक्षा जास्त ग्राहक असलेली जिओ, आपल्या यूझर्सला आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवीन प्लॅन्स आणि ऑफर्स लॉन्च करत असते. अलीकडे जिओ पुन्हा एकदा चर्चेत आहे, कारण त्यांनी ग्राहकांना फायदेशीर असे प्लॅन्स सादर केले आहेत. गेल्या जुलैमध्ये जिओने काही रिचार्ज प्लॅन्सच्या किंमती वाढवून काही बजेट ऑप्शन्स हटवले होते, पण ग्राहकांना फायदा होईल यासाठी त्यांनी काही नवीन किफायतशीर प्लॅन्स सुद्धा आणले आहेत, जे खासकरून जास्त डेटा वापरणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहेत.
या प्लॅनमुळे यूझर्सला अनलिमिटेड डेटा वापरण्याचा फायदा होतो, जो खास करून त्या वेळी उपयोगी पडतो जेव्हा तुमचा] डेटा संपलेला असतो आणि तुम्हाला अजून डेटा आवश्यक असतो. हा प्लॅन जिओच्या डेटा पॅक पर्यायांचा एक भाग आहे, जो ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजांना पूर्ण करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
49 रुपयांचा प्लॅन हा सर्वात किफायती पर्याय आहे, पण यामध्ये अनलिमिटेड डेटाची मर्यादा फेयर यूसेज पॉलिसी (FUP) नुसार असेल. तुम्ही अनलिमिटेड डेटा वापरू शकता, परंतु तो 25GB पर्यंतच असेल. त्यानंतर इंटरनेट स्पीड 40Kbps पर्यंत कमी होईल. हा प्लॅन फक्त एका दिवसासाठी वैध असणार, म्हणजेच 24 तासांनी तो निष्क्रिय होईल. जिओची ही नवीन ऑफर प्रतिस्पर्ध्यांसाठी एक आव्हान आहे, कारण Airtel, VI आणि BSNL सारख्या कंपन्यांना जिओच्या आकर्षक किंमतींना प्रतिस्पर्धी देणं कठीण होऊ शकतं.