मुंबई: 14 फेब्रुवारी 2025 मध्ये 'छावा' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली होती. अक्षयने साकारलेल्या औरंगजेबाच्या भूमिकेने सर्वांचे लक्ष वेधले. बऱ्याच काळानंतर, 'छावा' चित्रपटातून दमदार कमबॅक केल्याबद्दल अक्षयचे सर्वत्र कौतुक होत आहे. 'छावा' चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारल्यानंतर, अक्षय खन्ना 'महाकाली' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. प्रशांत वर्मा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. 'महाकाली' चित्रपटात अक्षय खन्ना एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा आणि त्यांच्या टीमने आज 'महाकाली' चित्रपटाची अधिकृत घोषणा केली. 'महाकाली' चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत वर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अभिनेता अक्षय खन्नाचा पहिला लूक शेअर केला आहे. 'देवांच्या सावलीत, बंडाची सर्वात तीक्ष्ण ज्वाला प्रकट झाली. अभिनेता अक्षय खन्ना महाकाली चित्रपटात असुरगुरू शुक्राचार्यची भूमिका साकारणार आहे', असं टिट्व दिग्दर्शक प्रशांत वर्माने केला आहे.
या चित्रपटात अक्षय खन्ना गुरू शुक्राचार्य यांची भूमिका साकारत आहे. गुरू शुक्राचार्य यांच्या भूमिकेत प्रेक्षकांनी अक्षय खन्नाला ओळखलेच नाही. अक्षय खन्नाने पांढरा पोशाख परिधान केला आहे. यासह, कपाळावर टिळा आणि डोळ्यात प्रकाश दिसून आहे. या लुकमध्ये पाहून प्रेक्षकांनी अक्षय खन्नाच्या लूकचे तोंडभरून कौतुक केले. या चित्रपटात अक्षय खन्नासह कोणते कलाकार दिसून येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. मात्र, हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
हेही वाचा: Sarang Sathey-Paula McGlynn Just Married : बारा वर्ष लिव्ह-इनमध्ये राहिल्यानंतर सारंग साठ्ये आणि पॉलानं बांधली लग्नगाठ; Photo Viral
अक्षय खन्नाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, अक्षय खन्नाने 14 फेब्रुवारी 2025 रोजी छावा चित्रपटातून बॉलिवूडमध्ये धमाकेदार कमबॅक केला होता. या चित्रपटात अक्षय खन्नासह, विक्की कौशल, रश्मिका मंदाना, डायना पेंटी, विनित कुमार सिंह, दिव्या दत्ता यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 600 कोटींहून अधिकची कमाई केली. 2022 मध्ये अक्षयने दृश्यम 2 चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.