Wednesday, November 19, 2025 12:45:16 PM

Nepal News : नेपाळच्या Gen Z चळवळीची राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा ; मात्र ठेवल्या 'या' अटी

गेल्या महिन्यात Gen Z युवकांनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया साईट्सवरील सरकारी बंदीविरोधात तीव्र निदर्शने केली, ज्यामुळे के.पी.शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारची सत्ता उलथवून टाकण्यात आले.

nepal news  नेपाळच्या gen z चळवळीची राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा  मात्र ठेवल्या या अटी

काठमांडू: नेपाळमधील Gen Z गटाने शनिवारी, 18 ऑक्टोबर 2025 रोजी एक राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली, मात्र पुढील वर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत Gen Z चा सहभाग काही अटी पूर्ण करण्यावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. काठमांडू येथील निवडणुका 5 मार्च 2026 रोजी होणार आहेत. 

गेल्या महिन्यात Gen Z युवकांनी भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया साईट्सवरील सरकारी बंदीविरोधात तीव्र निदर्शने केली, ज्यामुळे के.पी.शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकारची सत्ता उलथवून टाकण्यात आले. यादरम्यान, Gen Z चळवळीतील नेत्यांपैकी एक असलेल्या मिराज ढुंगाना यांच्या नेतृत्वातील गटाने पत्रकार परिषद घेत आपला अजेंडा जाहीर केला. मिराज ढुंगाना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, 'Gen Z तरुणांना एकत्र आणण्यासाठी आम्ही एका राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार करत असलो, तरी Gen Z च्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणूक लढवणार नाही'. 'देशात चांगले शासन, पारदर्शकता आणि भष्ट्राचारमुक्त व्यवस्थापन निर्माण करण्यासाठी कार्य करणार आहे. आम्ही Gen Z तरुणांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही', असंही मिराज ढुंगाना यांनी नमूद केले. पुढे ते असंही म्हणाले की, 'सध्या नवीन पक्षासाठी आम्ही योग्य नाव ठेवण्याचा विचार करत आहोत'. देशाचा आर्थिक विकास स्थगित झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना मिराज ढुंगाना म्हणाले की, 'रोजगारासाठी परदेशात जाणाऱ्या नेपाळी तरुणांच्या वाढत्या पलायनमुळे देशाचा आर्थिक विकास थांबला आहे. त्यामुळे, असा महत्त्वपूर्ण समस्या सोडवण्यासाठी आधीच्या सरकारला जबाबदार धरले पाहिजे'. 

हेही वाचा: Pakistan - Afghanistan Ceasefire : कतारमध्ये निर्णय! पाकिस्तान-अफगाणिस्तान युध्दविरामावर सहमती,जाणून घ्या

यादरम्यान, आर्थिक बाबींवरील Gen Z गटाच्या भूमिकेबद्दल बोलताना मिराज ढुंगाना यांनी देशांतर्गत उत्पादन वाढवण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, 'आपल्या देशाची लोकसंख्या अंदाजे तीन अब्ज आहे. त्यामुळे, आपल्याला शेजारच्या बाजारपेठांना लक्ष्य करून उत्पादन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे'. तसेच, मिराज ढुंगाना यांनी हंगामी सरकारला बंद उद्योग पुन्हा सुरू करण्याची आणि नवीन रोजगार निर्माण करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे आवाहनही केले. सोबतच, पर्यटन क्षेत्राचाही विकास आणि प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असं अधोरेखित केले. 
 


सम्बन्धित सामग्री