Sunday, June 15, 2025 12:19:42 PM

इटलीमध्ये सर्वात सक्रिय 'माउंट एटना' ज्वालामुखीचा उद्रेक; जीव मुठीत धरून पळाले पर्यटक, पहा व्हिडिओ

'माउंट एटना' ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर घटनास्थळावरून अनेक पर्यटक आपला जीव मुठीत धरून पळताना दिसले. काही वेळातच ज्वालामुखीतून निघणारी राख, धूर आणि गरम लावा मैल दूरवर पसरला.

इटलीमध्ये सर्वात सक्रिय माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक जीव मुठीत धरून पळाले पर्यटक पहा व्हिडिओ
Mount Etna volcano erupt
Edited Image

इटली: युरोपातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक मानल्या जाणाऱ्या माउंट एटना ज्वालामुखीचा इटलीमध्ये भयानक उद्रेक झाला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे लावा, राख आणि धूर दूरवर पसरले आहे. 'माउंट एटना' ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर घटनास्थळावरून अनेक पर्यटक आपला जीव मुठीत धरून पळताना दिसले. काही वेळातच ज्वालामुखीतून निघणारी राख, धूर आणि गरम लावा मैल दूरवर पसरला. अनेक पर्यटकांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला आहे. 

हेही वाचा - OMG! 20 वर्षांपासून पोहून पार करतात शाळेपर्यंतचे अंतर! कोण आहेत व्हायरल 'ट्यूब मास्टर'?

द सनच्या वृत्तानुसार, माउंट एटना ज्वालामुखीचा उद्रेक इतका भयानक होता की, यामुळे पृथ्वी हादरली. भयानक कंपने आणि सततच्या स्फोटांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ज्वालामुखीमध्ये उद्रेक झाल्यानंतर, त्यातून बाहेर पडणारा लावा कारंज्यासारखा बाहेर पडला. ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे जवळच्या कॅटानिया विमानतळावरील विमानांची उड्डाणे थांबवण्यात आली. 

हेही वाचा - रील बनवताना थायलंडमध्ये भारतीय पर्यटकावर वाघाचा हल्ला; नेमकं काय घडलं? पहा

दरम्यान, ज्वालामुखी सल्लागार केंद्र टूलूस (VAAC) ने प्रथम या उद्रेकासाठी रेड अलर्ट जारी केला, जो काही तासांनंतर ऑरेंज अलर्टमध्ये बदलण्यात आला. संस्थेने म्हटले आहे की राखेचे ढग प्रामुख्याने पाणी आणि सल्फर डायऑक्साइडपासून बनलेले आहेत, जे नैऋत्य दिशेकडे वाहत आहेत. तथापि, इटलीच्या राष्ट्रीय भूभौतिकशास्त्र आणि ज्वालामुखीशास्त्र संस्थेने (INGV) पुष्टी केली की, गेल्या शनिवारी रात्रीपासून स्ट्रॉम्बोलियन उद्रेक सतत सुरू आहेत, ज्याची तीव्रता सतत वाढत आहे. 
 


सम्बन्धित सामग्री