अहिल्यानगर: एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेत एका मुस्लिम महिलेच्या भाषणादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. ही सभा अहिल्यानगर येथे पार पडली. भाषण सुरू करण्यापूर्वी मुस्लिम महिलेने 'जय भीम, जय शिवराय' चा नारा दिला. यादरम्यान, मुस्लिम महिला म्हणाली की, 'हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जाती आणि बारा बलुतेदारांना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना केली होती'.