अहिल्यानगर: आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शिर्डीतील साईबाबा मंदिरात जाऊन साईबाबांची पूजा केली. यासह, अमित शहा आज अहिल्यानगर दौऱ्यावर होते. आज अमित शहांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण करण्यात आले. यासह, आज अमित शहांनी लोणीतील शेतकरी मेळाव्यात भाष्य केले. यावेळी, त्यांनी विरोधकांवर घणाघात टीका केली.
अमित शहा म्हणाले की, 'मला छान वाटलं, या भूमीला आणि जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यात आले. जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तेव्हा, भाजप आणि शिवसेना सरकारने औरंगाबाद आणि अहमदनगरचे नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्यात आले. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे समर्थक आहेत फक्त तेच हे काम करू शकतात. मात्र, औरंगजेबांच्या विचारांचे समर्थन करणाऱ्यांना औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर ठेवण्याची हिंमत नाही'.
हेही वाचा: Uddhav Thackeray On Ramdas Kadam : 'मी गद्दारांना उत्तर देत नाही...', उद्धव ठाकरेंचा रामदास कदमांवर हल्लाबोल
या मेळाव्यात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. यानंतर, अमित शहांनी पद्मश्री डॉ. विट्ठल राव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारित कामाचे उद्घाटन आणि पद्मश्री विखे पाटील यांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले.