Friday, February 13, 2026 06:10:54 PM

Chandrashekhar Bawankule: " आमचा एमआयएमशी कोणताही संबंध नाही" ; भाजप - एमआयएम युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी टाकला पडदा

पंचायत समित्यांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांप्रमाणे स्वीकृत सदस्यांची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.

chandrashekhar bawankule quot आमचा एमआयएमशी कोणताही संबंध नाहीquot  भाजप - एमआयएम युतीच्या चर्चांवर चंद्रशेखर बावनकुळेंनी टाकला पडदा

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असताना, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची तरतूद करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य समोर आले आहे. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगत, आगामी काळात हा कायदा मंत्रिमंडळ आणि विधिमंडळात मंजुरीसाठी मांडला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या संदर्भात बोलताना बावनकुळे म्हणाले की, लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळात (Cabinet) आणि त्यानंतर विधिमंडळाच्या सभागृहात मंजुरीसाठी सादर केला जाईल, अशी अपेक्षा आहे. ग्रामीण भागात लोकप्रतिनिधींकडून चांगल्या पद्धतीने काम होत असल्याने, पंचायत समित्यांमध्ये स्वीकृत सदस्यांची तरतूद करणारा कायदा अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महानगरपालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीही महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र निवडणुका लढवणार असल्याची घोषणा बावनकुळे यांनी केली. परभणी आणि लातूरसारख्या काही जिल्ह्यांमध्ये युती होणार असली, तरी काही ठिकाणी स्थानिक परिस्थितीमुळे युती शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Farmer Loan Waiver: अखेर तारीख ठरली; या' दिवशी होणार कर्जमाफी; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी दिली मोठी अपडेट

“जिथे शक्य आहे तिथे आम्ही शिवसेनेसोबत (शिंदे गट) प्रामाणिकपणे युती करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, काही ठिकाणी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि स्थानिक समीकरणांमुळे युती होत नाही. अशा ठिकाणी निर्णय परिस्थितीवर अवलंबून असेल,” असे बावनकुळे यांनी सांगितले.

अचलपूर महानगरपालिकेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, तेथे भाजपचे एकट्याचेच सुमारे 90 गट आहेत. इतर पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत असले, तरी भाजपने स्वतंत्र भूमिका घेतली आहे. “आमचा एमआयएमशी (AIMIM) कोणताही संबंध नाही. आम्ही कधीच एमआयएमसोबत नाही आणि भविष्यातही असणार नाही,” असा ठाम दावा त्यांनी केला. भाजप आणि एमआयएम यांच्यात कोणत्याही प्रकारचा पाठिंबा नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी या वादावर पडदा टाकला.

कल्याण - डोंबिवलीमध्ये शिंदे गटाची शिवसेना आणि मनसे यांच्यात परस्पर पाठिंब्याचे चित्र दिसत असल्याबाबत विचारले असता, बावनकुळे म्हणाले की, “तेथील स्थानिक परिस्थितीनुसार काही निर्णय झाले असतील. मात्र, राज्यपातळीवर महायुतीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना पुन्हा एकत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीत आहे. याबाबत चर्चा सुरू आहे.”

महानगरपालिका निवडणुकांबाबत त्यांनी सांगितले की, यापूर्वी 15 ठिकाणी महायुतीने एकत्र निवडणुका लढवल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशामधून राज्यात परतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह सर्व नेत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. जिथे एकत्र निवडणुका लढवल्या नाहीत, तिथे चर्चा करून युती करण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि जिथे आधीपासून युती आहे तिथे ती कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाबाबत विचारण्यात आले असता, बावनकुळे म्हणाले की, संबंधित प्रकरणात पोलीस योग्य ती कारवाई करतील. “या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसारच पुढील कार्यवाही होईल,” असे सांगत त्यांनी या विषयावर अधिक भाष्य टाळले.

हेही वाचा: Gold Silver Rate Today: बायको खुश, खिसाही खुश; सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोने खरेदीची वेळ आली का?


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या