Monday, February 10, 2025 12:27:11 PM

Poojaghar According Vastushastra
जाणून घ्या वास्तूनुसार पूजाघराचे योग्य स्थान

ईशान्य दिशेला पूजाघर ठेवणे सर्वाधिक शुभ; दक्षिण दिशेला पूजाघर टाळा

जाणून घ्या वास्तूनुसार पूजाघराचे योग्य स्थान

मुंबई: घरात पूजाघर असणे केवळ धार्मिक गरज नाही तर सकारात्मक आणि शांत ऊर्जेचा स्रोतदेखील आहे. पूजाघरामुळे घरात शुभ आणि दिव्य वातावरण निर्माण होते. मात्र, पूजाघराचे स्थान आणि मांडणी करताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. योग्य वास्तुशास्त्राचे पालन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आनंद, समृद्धीची घरात भर होते .

पूजाघराच्या स्थानाची निवड:
वास्तुशास्त्रानुसार पूजाघर ठेवण्यासाठी ईशान्य दिशा सर्वोत्तम मानली जाते. ही दिशा भगवान शंकराची असल्याने ती अत्यंत शुभ मानली जाते. ईशान्य दिशेनंतर पूर्व किंवा उत्तर दिशादेखील पूजाघरासाठी योग्य आहेत. मात्र, दक्षिण दिशेला पूजाघर ठेवणे अशुभ मानले जाते आणि ते टाळावे. तसेच, शिडीखाली किंवा प्रसाधनगृहाजवळ पूजाघर ठेवू नये, कारण अशा जागा अपवित्र मानल्या जातात. पूजाघर तळमजल्यावर किंवा अती उंच मजल्यावर ठेवणेही टाळावे, कारण ते वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही.

पूजाघरातील रचना:
पूजाघराचे  दार आणि खिडक्या उत्तर किंवा पूर्वेकडे उघडणाऱ्या असाव्यात. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी पूजाघराचे छप्पर  पिरॅमिडच्या आकाराचे असावे.

पूर्वेकडे मुख असलेल्या घरासाठी पूजाघर:
ज्या घराचे तोंड पूर्व दिशेकडे आहे, त्या घरासाठी पूजाघर उत्तर किंवा पूर्व कोपऱ्यात ठेवणे वास्तुशास्त्रानुसार योग्य आहे.
घरातील पूजाघराची योग्य रचना आणि दिशा केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर मानसिक शांतता आणि सकारात्मकतेसाठी पण अत्यंत महत्त्वाची आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)


सम्बन्धित सामग्री