Wednesday, April 22, 2026 11:54:59 PM

Crime News: ‘या मुली माझी बदनामी करत होत्या, माझ्या आईवडिलांना मारणार होते’; 19 वर्षीय पायलनं आरोप करत संपवलं जीवन

या घटनेमुळे तरुणांमधील वाढते मानसिक तणाव आणि भावनिक आरोग्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

crime news ‘या मुली माझी बदनामी करत होत्या माझ्या आईवडिलांना मारणार होते’ 19 वर्षीय पायलनं आरोप करत संपवलं जीवन

पुणे: युवक-युवतींमध्ये वाढत चाललेली मानसिक तणावाची समस्या आणि त्यातून घेतले जाणारे टोकाचे निर्णय हा समाजासमोर गंभीर प्रश्न बनत आहे. विविध कारणांमुळे तरुणांमध्ये निराशेचे प्रमाण वाढत असल्याने पालकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा पार्श्वभूमीवर शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

पुण्यातील चंदननगर परिसरात 19 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पायल राजगुरू असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव असून, तिच्या रूममध्ये राहणाऱ्या तीन मैत्रिणींकडून सतत चिडवणे आणि मानसिक त्रास दिला जात असल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पायल राजगुरू ही चंदननगर परिसरात राहत होती. तिच्या रूममध्ये राहणाऱ्या तीन मैत्रिणींकडून तिला वारंवार चिडवले जात होते तसेच मानसिक त्रास दिला जात होता. या सततच्या त्रासामुळे ती नैराश्यात गेल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: Fuel Crisis: इंधन तुटवडा रोखण्यासाठी केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये; अमित शहांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

या प्रकरणात पायलने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित मैत्रिणींवर गंभीर आरोप केले आहेत. या मुली मला त्रास देत होत्या, माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करत होत्या तसेच माझ्या आई-वडिलांनाही मारण्याची धमकी देत होत्या, असा उल्लेख तिने सुसाईड नोटमध्ये केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी सबुरी काळे, शिवानी आजमले आणि दिपाली या तीन मैत्रिणींविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तरुणांमधील वाढते नैराश्य, मित्र-मैत्रिणींकडून होणारा मानसिक छळ आणि त्याचे गंभीर परिणाम याबाबत पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: Iran US Israel War: इराणचा इस्रायलवर भीषण प्रहार; हैफा ते तेल अवीव हादरले, तब्बल पाच तास सुरू राहिला रॉकेटचा वर्षाव


सम्बन्धित सामग्री