Sunday, March 08, 2026 10:38:07 PM

Samsung Galaxy S26 : 25 फेब्रुवारीला धमाका! सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात स्मार्टफोन सिरीज, बुकिंग कसं करायचं? जाणून घ्या

Galaxy AI वर आधारित नव्या कॅमेरा अनुभवामुळे फोटो व व्हिडिओ एडिटिंग काही क्षणांत शक्य होणार आहे. प्री-ऑर्डरवर क्रेडिट आणि ट्रेड-इन ऑफर्सही जाहीर करण्यात आल्या आहेत.

samsung galaxy s26  25 फेब्रुवारीला धमाका सॅमसंगची आतापर्यंतची सर्वात स्मार्टफोन सिरीज बुकिंग कसं करायचं जाणून घ्या

दक्षिण कोरिया: पुढील आठवड्यातच सॅमसंगची स्मार्टफोन मालिका Galaxy S26 अधिकृतपणे सादर होणार आहे. 25 फेब्रुवारीला होणाऱ्या Galaxy Unpacked कार्यक्रमात या मालिकेचे अनावरण होणार असून, कंपनीने आधीच Galaxy AI वर आधारित नव्या कॅमेरा अनुभवाची झलक दाखवली आहे.

सॅमसंगच्या मते, हा नवा कॅमेरा अनुभव फोटो आणि व्हिडिओ कॅप्चरिंग, एडिटिंग आणि शेअरिंग यांना एकसंध, सुलभ प्रणालीत एकत्र ठेवता येईल. संपूर्ण तपशील पुढील आठवड्यात जाहीर होणार असला, तरी काही वैशिष्ट्यांची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या AI टूलच्या मदतीने छायाचित्रांमधील हरवलेले भाग पुन्हा तयार करता येणार आहेत. उदाहरणार्थ, अर्धवट खाल्लेल्या कपकेकचा फोटो असेल, तर तो पूर्ण आणि न खाल्ल्यासारखा दिसेल, असे एडिटिंग करता येईल. तसेच दिवसा काढलेला फोटो काही सेकंदांत रात्रीच्या वातावरणात रूपांतरित करता येणार आहे. अनेक फोटो एकत्र करून एकच परिपूर्ण प्रतिमा तयार करण्याची सुविधाही या प्रणालीत असेल.

हेही वाचा: Amravati Accident : अमरावती हादरली! ST बस आणि रिक्षामध्ये भीषण धडक; शाळकरी मुलासह 4 जणांचा करुण अंत

कंपनीचा दावा आहे की, या AI-आधारित साधनामुळे तासन्तास लागणारे एडिटिंग काही क्षणांत पूर्ण होईल. यासोबतच प्रायव्हसी डिस्प्ले, Now Nudge यांसारखी इतर नवी वैशिष्ट्येही Galaxy S26 मालिकेत अपेक्षित आहेत.

Galaxy S26 सीरिज 25 फेब्रुवारीला लॉन्च होणार असली, तरी ग्राहकांना आधीच आरक्षण करण्याची संधी देण्यात आली आहे. आरक्षण केल्यास प्री-ऑर्डरवेळी 30 डॉलरचे क्रेडिट मिळेल. तसेच प्री-ऑर्डर करणाऱ्यांना 5,000 डॉलरच्या गिफ्ट कार्ड जिंकण्याची संधीही आहे. ट्रेड-इन पर्याय निवडल्यास 900 डॉलरपर्यंत अतिरिक्त बचत मिळू शकते, तर ट्रेड-इन न करता प्री-ऑर्डर केल्यास 150 डॉलरचे क्रेडिट मिळणार आहे. बुकिंग संदर्भातील अधिक माहिती www.samsung.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

Galaxy AI वर आधारित हा नवा कॅमेरा अनुभव स्मार्टफोन फोटोग्राफीला एक वेगळी दिशा देईल का, याची उत्सुकता आता तंत्रज्ञानप्रेमींमध्ये वाढली आहे. 25 फेब्रुवारीचा सॅमसंगचा हा कार्यक्रम या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे.

हेही वाचा: Heart Attack on Badminton Court: बॅडमिंटन खेळताना 57 वर्षीय व्यापाऱ्याचा मृत्यू; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

 


सम्बन्धित सामग्री