पुणे: फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या अत्याचारप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. प्रशांतला पुण्यातून अटक करण्यात आली असून तो त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपून बसला होता.
हेही वाचा: Satara: रात्री फलटणच्या हॉटेलमध्ये गेली अन्..., महिला डॉक्टरच्या अखेरच्या 10 तासात काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, स्वत:ला संपवण्यापूर्वी डॉक्टर तरुणीने आपल्या हातावर सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात तिने प्रशांत बनकरचं नाव स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्या नोटमध्ये, पीडितेने असा आरोप केला होता की, 'प्रशांतने आपला शारीरिक आणि मानसिक छळ केला'. या प्रकरणात, पोलिसांनी जलदगतीने तपास सुरू केला असून, आरोपी प्रशांत बनकरला न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.