मुंबई: आजकाल धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत शारीरिक थकवा, अंगदुखी आणि मानसिक थकावट ही रोजचीच गोष्ट झाली आहे. अशावेळी अनेकजण त्वरित आराम मिळवण्यासाठी वेदनाशामक औषधांकडे वळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? घरच्या घरीही एक सोपी आणि नैसर्गिक उपाययोजना आहे, जी शरीराला आणि मनालाही आराम देते? ती म्हणजे मिठाच्या पाण्याने आंघोळ करणे होय. विशेषत: समुद्री मीठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील ताण कमी होतो, त्वचा निरोगी राहते आणि ऊर्जा पुन्हा मिळते. चला तर जाणून घेऊया या साध्या पण जादुई उपायाचे काही अद्भुत फायदे.
हेल्थलाइन वेबसाईने दिलेल्या माहितीनुसार, समुद्री मिठाच्या पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला आणि शरीराला अनेक फायदे होतात. यात मग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशियम आणि अनेक उपयुक्त खनिजे असतात, जी आपल्या त्वचा, स्नायू आणि सांध्याच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे त्वचेतील मृत पेशी काढून टाकते, नवीन पेशी तयार करण्यात मदत करते, त्वचेला माऊ आणि हायड्रेट ठेवते. दिवसभर बसून काम करणाऱ्यांसाठी ही आंघोळ अत्यंत फायदेशीर ठरते. इतकंच नाही, तर मिठाचे पाणी आंघोळीसाठी वापरल्याने शरीरातील रक्ताभिसरण वाढवते, स्नायू दुखणे कमी करते आणि थकलेल्या पायांना आराम देते. फक्त शरीरालाच नाही, तर मनालाही या आंघोळीचा फायदा होतो, तणाव कमी होतो आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते.
हेही वाचा: How To Get Vitamin D: सकाळी की संध्याकाळी? जाणून घ्या व्हिटामिन D साठी सूर्यप्रकाश घेण्याची योग्य वेळ
'हा' आहे प्रभावशाली उपाय
एका टबमध्ये गरम पाणी भरा आणि त्यात 1/4 कप ते 2 कप समुद्री मीठ घाला. मीठ पूर्णपणे विरघळल्यावर त्या पाण्यात 15-20 मिनिटे बसा. त्यानंतर, साध्या कोमट पाण्याने स्वत:चे शरीर धुवा आणि मॉइश्चरायझर लावा. मात्र, जर तुमच्या त्वचेवर जखम, संसर्ग किंवा मिठाची अॅलर्जी असेल, तर हा उपाय करू नका.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)