Monday, November 17, 2025 05:54:20 AM

National Awards 2025 : मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' बाल कलाकारांना मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी दिल्लीतील विज्ञान भवनात 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

national awards 2025  मराठी चित्रपटसृष्टीतील या बाल कलाकारांना मिळाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी दिल्लीतील विज्ञान भवनात 71 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडला. या, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते. जवान चित्रपटासाठी शाहरुख खान आणि 12th फेल चित्रपटासाठी विक्रांत मेस्सीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. सोबतच, राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. यासह, इतर कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यादरम्यान, अनेक बालकलाकारांनाही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देण्यात आला. यात महाराष्ट्रातील अनेक बाल कलाकारांचा समावेश आहे. चला तर सविस्तर जाणून घेऊया. 

हेही वाचा: 71st National Film Awards : विक्रांत मॅस्सी, शाहरुख सर्वोत्कृष्ट अभिनेते; राणी मुखर्जीही सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, 'श्यामची आई'लाही पुरस्कार

मराठी चित्रपटसृष्टीतील 'या' बाल कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

मराठी चित्रपट 'नाळ 2' साठी, त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप यांना सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. सोबतच,  कबीर खंदारेला 'जिप्सी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बाल कलाकार पुरस्काराने सम्मानित केले. हा पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बालकलाकारांना देण्यात आले. या बालकलाकारांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते बालकलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण आहे. 

नाळ 2 चित्रपट 10 नोव्हेंबर 2023 रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात बालकलाकार श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे आणि देविका दफ्तरदार मुख्य भूमिकेत होते. यासह, त्रिशा ठोसर, दिप्ती देवी पार्वती, भार्गव जगताप, जितेंद्र जोशी महत्त्वाच्या भूमिकेत होते. 


सम्बन्धित सामग्री