Iran Bushehr Nuclear Plant
Edited Image
Bushehr Nuclear Power Plant In Iran: गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. 12 दिवसांच्या संघर्षानंतर आज दोन्ही देशांमध्ये युद्धविरोम घोषीत करण्यात आला आहे. इराणला अणुबॉम्ब बनवायचा आहे, परंतु, इस्रायल याला विरोध करत आहे. त्यामुळे इस्रायलने 12 जून रोजी इराणवर हल्ला करून इराणमधील अणुबॉम्ब स्थळे नष्ट केली. इराणकडे फोर्डो, नतान्झ, इस्फहान, तेहरान, बुशेहर, कारज, अरक, अनराक, साघंद, अर्दाकान, सिरिक, दारखविन अशी 12 अणुबॉम्ब स्थळे आहेत. इस्रायलने इराणच्या प्रमुख अणुबॉम्ब स्थळांवर हल्ला केला आहे. अमेरिकेने फोर्डो आणि नतान्झ अणुबॉम्ब स्थळांना इराणची सर्वात मोठी अणुबॉम्ब स्थळे म्हटले आहे.
अमेरिकेचा इराणच्या फोर्डो-नतान्झ अणुबॉम्ब स्थळांवर हल्ला
दरम्यान, दोन्ही देशातील युद्धात अमेरिकेने इस्त्रायलला पाठिंबा दिला. तसेच 22 जून रोजी पहाटे अमेरिकेने इराणच्या फोर्डो अणुबॉम्ब स्थळावर बॉम्बहल्ला केला. नतान्झ अणुबॉम्ब स्थळावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. इस्रायल आणि अमेरिकेने इराणचे अणुबॉम्ब स्थळ नष्ट करण्याच्या उद्देशाने हा हल्ला केला, परंतु बुशेहर अणुबॉम्ब प्लँट हा इराणच्या 12 अणुबॉम्ब पैकी एक आहे, ज्याचा संपूर्ण 12 दिवसांच्या युद्धात एकाही दिवसासाठी उल्लेख करण्यात आला नाही. फोर्डो आणि नतान्झवरील हल्ल्यानंतर अणु किरणोत्सर्ग बाहेर पडला नाही, परंतु जर या अणु तळावर हल्ला झाला असता आणि किरणोत्सर्ग बाहेर पडला असता. यामुळे इराणसह 5 आखाती देशांतील लाखो लोक मृत्युमुखी पडले असते.
हेही वाचा - इराण-इस्रायल युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण
बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्यास मोठा अनर्थ -
तथापि, बुशहर अणुऊर्जा प्रकल्प हा इराणचा एकमेव कार्यरत अणुभट्टी आहे, जो आखाताच्या किनाऱ्यावर बांधलेला आहे. जर या अणु तळावर हल्ला झाला तर किरणोत्सर्गी घटक हवेत, मातीत तसेच समुद्राच्या पाण्यात पसरू शकतात. यामुळे आखाताच्या किनाऱ्यावर असलेल्या देशांचे, कतार, बहरीन, युएई आणि कुवेतचे मोठे नुकसान होऊ शकते. जगभरातील शास्त्रज्ञांचा असाही विश्वास आहे की बुशहरवर हल्ला करणे धोकादायक आणि मूर्खपणाचे ठरेल.
हेही वाचा - 'युद्धविराम आता सुरू झाला आहे, तो मोडू नका'; ट्रम्प यांचे इराण आणि इस्रायलला आवाहन
किरणोत्सारामुळे लाखो लोकांचा बळी -
या अणु प्रकल्पावर बसवलेल्या अणुभट्टीत क्षेपणास्त्र डागण्यात आले तर त्यातून होणारा किरणोत्सर्ग लाखो लोकांचा बळी घेऊ शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे (IAEA) संचालक राफेल ग्रोसी यांनी असेही म्हटले आहे की आखाती किनाऱ्यावर असलेल्या रशियन-निर्मित बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर थेट हल्ला केल्यास बरीच किरणोत्सर्गीता निर्माण होऊ शकते, ज्याचे परिणाम इराणसह अनेक देशांना भोगावे लागतील.