मुंबई: आयपीएलचा (IPL) अठरावा हंगाम 21 मार्चला सुरू होणार आहे. ईडन गार्डन्समध्ये (Eden Gardens) पहिला सामना तसेच 25 मे रोजी अंतिम सामना होईल. याचबरोबर 2025 वूमेन्स प्रीमियर लीग (WPL) 7 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान आयोजित केली जाणार आहे.
नोव्हेंबरमधील मेगा ऑक्शनच्या आधी, बीसीसीआयने (BCCI) 2025-27 हंगामांसाठी फ्रँचायझींना (franchise) स्पर्धेच्या वेळापत्रकाची माहिती दिली होती. 2025 साठी संभावित काळ 15 मार्च ते 25 मे दरम्यान ठरवण्यात आला होता. परंतु, चॅम्पियन्स ट्रॉफीचा (Champions Trophy) अंतिम सामना 9 मार्चला असल्यानं, आयपीएलने या स्पर्धांमध्ये दोन आठवड्यांचं अंतर ठेवलं आणि 21 मार्च रोजी स्पर्धेची सुरुवात केली. आयपीएलचं (IPL) संपूर्ण वेळापत्रकही या महिन्याच्या अखेरीस जाहीर होईल.
गतवर्षीच्या विजेत्या संघाचं घरचं मैदान पहिला आणि अंतिम सामना आयोजित करेल. यावेळी, 2024 आयपीएलच्या (IPL) विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सचे (kolkata knight Riders) घरचं मैदान असलेले ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथे आयपीएलचा प्रारंभ आणि शेवट होणार आहे.
2025 हंगामात 74 सामने होतील, जे मागील तीन हंगामांसारखेच आहे. हे 2022 मध्ये आयपीएलने 2023-27 सायकलसाठी मीडिया अधिकारांची विक्री करताना दिलेल्या 84 सामन्यांच्या तुलनेत 10 कमी आहेत. 2023 आणि 2024 साठी 74 सामने, 2025 आणि 2026 साठी 84 सामने, आणि 2027 मध्ये 94 सामन्यांचा पर्याय बीसीसीआयने (BCCI) खुला ठेवला आहे.