Thu. Jun 20th, 2019

‘या’ रिक्षावाल्याच्या प्रामाणिकपणा पाहून तुमचाही चांगुलपणावर विश्वास बसेल!

0Shares

आजच्या काळात प्रामाणिकपणा हा गुण दुर्मीळ होत चालल्याचं म्हटलं जातं. मात्र अजूनही जगात चांगुलपणा, सच्चेपणा, प्रामाणिकपणा यांसारख्या गोष्टी जगात अस्तित्वात आहेत, हे एखाद्या उदाहरणावरून दिसून येतात आणि जग हे अजूनही चांगलं असल्याची जाणीव देऊन जातात. पिंपरी येथे अशीच एक घटना घडली आहे. अभय नरवडे यांची तब्बल 50 हजार रुपयांची मोठी रक्कम एका प्रामाणिक रिक्षाचालकाने त्यांना परत मिळवून दिली आहे. इमानदार रिक्षा चालकाने रस्त्याच्या कडेला सापडलेले 50 हजार रुपये आणि महत्वाची कागदपत्र पोलिसांच्या मार्फत मूळ मालकांपर्यंत पोहचते केले आहेत.

काय घडलं नेमकं?

महेश कोळी हे टॅक्स ऑफिस मध्ये कामाला असून अभय नरवडे यांनी त्यांना 50 हजार रुपये टॅक्स भरण्यासाठी दिले होते.

महेश हे पैसे घेऊन ऑफिसला दुचाकीवरून पिंपळे गुरव वरून कार्यालयात जात होते.

तेव्हा सोबत असलेले पैसे पीडब्ल्यूडी मैदानाजवळ पडले.

ते पैसे रिक्षा चालक जितेंद्र गायकवाड यांना रस्त्याच्या कडेला पिवळ्या पिशवीत सापडले.

जितेंद्र मनोहर गायकवाड असं 48 वर्षीय रिक्षा चालकांचं नाव आहे.

त्यांनी नुकताच एक महिन्यापूर्वी रिक्षा विकत घेऊन व्यवसाय सुरू केला होता.

पैसे हरवल्याची बाब ऑफिसला गेल्यानंतर महेश यांच्या लक्षात आली.

त्यांनी तातडीने पैशाची शोधाशोध सुरू केली. ज्या रस्त्याने आले, तो रस्ता पालथा घातला.

पैसे कुठे पडले याचा शोध घेतला. परंतु, त्यांना पैसे सापडले नाहीत.

रिक्षा चालक जितेंद्र गायकवाड यांनी दिवसभर त्या रस्त्याने फेऱ्या मारल्या.

त्यांना वाटलं कोणीतरी पैश्यांविषयी विचारेल.

पण तसं न झाल्याने त्यांनी सकाळी सांगवी पोलीस ठाणे गाठत 50 हजार रुपये रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र पोलिसांकडे दिली.

तेवढ्यात योगायोगाने महेश काळे आणि मूळ मालक अभय हे सांगवी पोलिसात पैसे हरवल्याची तक्रार देण्यासाठी आले होते.

पोलिसांनी तात्काळ त्यांचेच पैसे आहेत का याची पडताळणी करून संबंधित मूळ मालकाला पैसे परत केले आहेत.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक पन्हाळे, कर्मचारी बोऱ्हाडे यांनी रिक्षा चालक जितेंद्र गायकवाड यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या इमानदारीचं कौतुक केलं.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: