Mon. Feb 24th, 2020

reality-behind-the-death-of-a-man-who-ate-pigeon-s-egg-omelette

बहिणीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या भावाने मित्राच्या मदतीने मेहुण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. तेलगाव नाक्यावर बुधवारी संध्याकाळी 5च्या सुमारास ही घटना घडली असून हत्येनंतर आरोपी पसार झाले आहेत. 

beed-sairatmurder2.jpg

 

नेमकं काय घडलं ?

  • बीडच्या तालखेड येथे राहणारा सुमित वाघमारे हा आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होता.
  • महाविद्यालयात त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या भाग्यश्री लांडगे या तरुणीशी सुमितची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले.
  • सुमित आणि भाग्यश्रीने 2 महिन्यांपूर्वी कोर्टात जाऊन विवाह केला.
  • या विवाहाला भाग्यश्रीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे याला देखील हा विवाह मान्य नव्हता.
  • बुधवारी सुमित आणि भाग्यश्री हे दोघे परीक्षेसाठी महाविद्यालयात आले होते. परीक्षा संपवून दोघेही महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच बालाजी लांडगे आणि त्याचा एक साथीदार तिथे पोहोचले.
  • दोघेही एका कारमधून आले. त्यांनी सुमितवर धारदार शस्त्राने वार केले आणि तेथुन पळ काढला.

पतीवर डोळ्यादेखत हल्ला झाल्याने भाग्यश्रीला सुरुवातीला नेमकं काय घडलं हे कळलेच नाही. रिक्षाचालक आणि स्थानिकांच्या मदतीने तिने पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा उपचारादरम्यानच मृत्यू झाला.

या घटनेनंतर जोपर्यंत आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईंकांनी नकार दिला होता, मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर वाघमारे कुटूंबियांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *