Tue. Aug 20th, 2019

भीषण! पतीच्याच सांगण्यावरून मित्र करत पत्नीवर सामूहिक बलात्कार…

0Shares

हापूड सामूहिक बलात्कार प्रकरणामध्ये पीडित महिलेने नोंदवलेल्या जबाबामुळे एका भीषण घटनेची उकल झाली आहे. 80% भाजलेली ही महिला सध्या रूग्णालयात उपचार घेत आहे. या महिलेला पतीने जाळल्याची सुरूवातीला शक्यता व्यक्त होत होती. मात्र या पीडित महिलेनेच स्वतःला जाळून घेतल्याचं तिने जबाबात सांगितलं. आपण आत्महत्येचा प्रयत्न का करत आहोत, याचा खुलासा करताना तिने भीषण आपल्या वैवाहिक जीवनात असणाऱ्या भीषणतेची माहिती दिली, जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

20 जणांनी केला बलात्कार!

पीडित महिला ही अल्पवयीन असतानाच तिचा म्हाताऱ्या माणसाशी विवाह लावण्यात आला.

म्हातारा नवरा काही दिवसांतच मृत पावला, तेव्हा वडिलांनी या मुलीचं दुसरं लग्न लावलं.

दुसऱ्या लग्नासाठी तिच्या वडिलांनी चक्क 10,000 रुपये घेतले होते. म्हणजेच मुलीला विकलं होतं.

हा दुसरा पती अतिशय विकृत असल्याचं जबाबात सांगण्यात आलंय.

आपल्या मित्रांना घरी बोलवून विकृत इसम आपल्याच पत्नीवर बलात्कार करायला त्यांना सांगत असे.

पतीच्या सांगण्यावरून त्याच्यासमक्षच त्याच्या पत्नीवर त्याचे मित्र सामूहिक बलात्कार करत.

या प्रकारामुळे ती अक्षरशः हतबल झाली होती.

पण हा प्रकार इथवरच थांबला नाही.

तिचाच पती तिच्यावर इतर लोकांद्वारे बलात्कार करवत असल्याची बातमी लोकांमध्ये पसरली.

यामुळे पीडित महिला बदनाम झाली.

या गोष्टीचा गैरफायदा घेत अनेकांनी तिच्यावर बलात्कार केला

आपल्यावर आत्तापर्यंत 20 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती तिने जबाबात दिली.

आपल्याला न्य़ाय मिळावा, यासाठी आधी वडिलांकडे  नंतर पोलिसांकडे तिने मदत मागितली. मात्र कुणीच तिला मदत केली नाही.

सर्व उपाय थकल्यावर अखेर ज्या शरीरासाठी वासनांध लोक आपल्यावर बलात्कार करत आहे, ते शरीरच नष्ट करण्याचा तिने निर्णय घेतला आणि स्वतःवर रॉकेल ओतून तिने स्वतःला पेटवून घेतलं.

या महिलेला 3 मुलं असून पहिलं पहिल्या पतीपासून, दुसरं विकृत पतीपासून आणि तिसरं बलात्काऱ्यांपैकी एकाचं असल्याचं सांगण्यात येत आहे. या महिलेच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या जबानीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. पोलिसांनी आता या प्रकरणाची दखल घेत 14 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *