Wed. Nov 13th, 2019

पालघरमध्ये गटारीला झाकण नसल्याने घोडा गटारीत पडला !

नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गटारीचं झाकण काढलेलं असणं, निष्कृष्ट दर्जाच काम, महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे अशा घटना घडत आहे. यातचं पालघर मधील एक धक्कादायक घटना समोर आली. पालघरमध्ये गटारीला झाकण नसल्याने घोडा गटारीत पडल्याची घटना घडली आहे.

नेमकं कारण काय?

पालघर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा फटका आता मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. पालघर बोईसर रस्त्यावरील गोठणपूर येथे बंदिस्त गटारांना झाकण नसल्याने चक्क एक घोडाच या गटारात पडल्याची घटना घडली आहे.

मात्र या गटारींची खोली जास्त असल्याने या घोड्याला बाहेर निघता येत नव्हतं. ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच स्थानिकांनी धावाधाव करत jcb च्या सहाय्याने गटारीवरील स्लॅब दूर करत या घोड्याला सुखरूप बाहेर काढलं.

पालघर मध्ये गटारींची दुरावस्था असून झाकणं नसल्याने पायी चालणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी नगरपरिषद खेळत असल्याचं समोर आलं आहे. पालघर नगरपरिषदच्या या भोंगळ कारभाराचा येथील स्थानिक तसचं जवळच असलेल्या महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची नेहमीच डोके दुःखी ठरली आहे. नाल्यात पडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गटारीचं झाकण काढलेलं असणं, निष्कृष्ट दर्जाच काम, महापालिकेचे दुर्लक्ष यामुळे अशा घटना घडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *