धक्कादायक! पुण्यात रुग्णांच्या जेवणात रक्ताने भरलेले कापसाचे बोळे

रुग्णालयात रुग्णांच्या आरोग्याबाबत हेळसांड केली जात असल्याच्या घटना वारंवार घडत असतात. अशीच एक घटना पुण्याच्या जहांगीर हॉस्पिटलच्या मॅटनिटी वॉर्ड मध्ये घडली आहे. या हॉस्पिटल मध्ये रुग्णांना जेवण, नाष्टा देण्यात येतो. या जेवणात रक्ताने भरलेले कापसाचे बोळे आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेनंतर हॉस्पिटल मध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाला होता. तर रुग्णालय प्रशासन यावर काहीही बोलण्यास तयार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
नेमक काय घडलं?
अनेक हॉस्पिटलमध्ये रुग्णांना जेवण देण्याची सोय आहे.
पुण्यात जहांगीर हॉस्पिटलमध्येही रुग्णांना जेवण देण्याची सोय आहे.
त्यातील एका रुग्णांच्या जेवणात शनिवारी रक्ताचा बोळा आढळून आला आहे.
या धक्कादायक प्रकाराने जहांगीर हॉस्पिटलमध्ये खळबळ उडाली.
या हॉस्पिटलमध्ये दोन दिवसांच्या बाळंतीण रुग्णाला हे जेवण देण्यात आले होते.
यामुळे रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
रुग्णाच्या नातेवाईकांना या प्रकाराने धक्का बसला असून संतप्त नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे धाव घेतली.
रुग्णाला इतक्या बेफिकीरीने ट्रीटमेंट केल्याने रुग्णाच्या पतीने याबाबत रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली आहे.
मात्र रुग्णालयाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. असं सांगण्यात येत आहे.
तर रुग्णालय प्रशासन यावर काहीही बोलण्यास तयार नसल्याचेही सांगण्यात येत आहे.