धमाल आणि ग्लॅमरला पुनर्जन्माचा तडका देणाऱ्या ‘हाऊसफुल 4’ चं ट्रेलर!
या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Housefull सिनेमाचे आत्तापर्यंत 3 भाग येऊन गेले आणि आता चौथ्या भागाची लोकांना प्रतीक्षा आहे. धमाल विनोद आणि ग्लॅमर ही हाऊसफुल सीरिजची नेहमीच जमेची बाजू राहिली आहे. यावेळी Housefull 4 मध्येही विनोदाची आणि ग्लॅमरची मेजवानी अनुभवायला मिळेल, असं सिनेमाच्या ट्रेलरवरून दिसतंय.
“हाऊसफुल 4” हा हाऊसफुल या फ्रँचाइजीमधला चौथा चित्रपट आहे.
हाऊसफुल 4 या चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सर्व पुनर्जन्माची कथा असल्याचं दिसतंय.
सगळ्याच प्रमुख पात्रांचा या सिनेमात Double role आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे कलाकार आहेतच. मात्र यावेळी त्यांच्यासोबत बॉबी देओलही आहे.
कृती सनॉन, पूजा हेगडे आणि कृती खरबंदा या हिरोईन्सचाही डबल रोल आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर एकाचवेळी दुबई, युके आणि ऑस्टोलिया येथे प्रदर्शित करण्यात आला आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन आधी साजिद खान करणार होता. मात्र # MeToo प्रकरणात त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यावर या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजीकडे सोपवण्यात आलं.
तसंच या सिनेमात नाना पाटेकर यांचीही महत्त्वाची भूमिका होती. मात्र त्यांच्यावरही अभिनेत्री तनुक्षी दत्ताने #MeToo चे आरोप लावल्यावरही त्यांना सिनेमा सोडावा लागला होता. त्यांची भूमिका आता राना दुग्गबाटी करतोय.
हा सिनेमा 26 ऑक्टोबरला रिलीज होतोय.