फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी किती चांगले, किती वाईट?

फ्रेंच फ्राईज हे आरोग्यासाठी चांगलं नसल्याचं म्हटलं जातं. कारण फ्रेंच फ्राईज म्हणजे बटाट्याचे काप असतात. त्यात ते तेलात तळलेले असतात. त्यामुळे कोलॅस्टरॉल वाढतं. बटाट्यामधील स्टार्च आणि शोषलेल्या तेलामुळे फ्रेंच फ्राईज आरोग्याला हानीकारक असल्याचं मानलं जातं. मात्र फ्रेंच फ्राईज प्रत्यक्षात शरीरासाठी अजिबात हानीकारक नसल्याचा दावा एका इटालियन शेफने केला आहे.
बटाटे जर योग्य प्रकारे तळले, तर जास्त तेल शोषलं जात नाही.
बटाट्यामधील स्टार्चमुळेच बटाट्यात जास्त तेल शोषलं जात नाही.
बटाटे कमी तेलातही कुरकुरीत होऊ शकतात.
त्यामुळे फ्रेंच फ्राईज आरोग्यासाठी हानीकारक नसतात.
त्यामुळे जर चांगल्या दर्जाच्या तेलात योग्यरीत्या बटाट्याचे काप तळले असल्यास ते आरोग्यासाठी निश्चितच चांगले असतात.