Thu. Sep 29th, 2022

‘लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर टीका केली आहे. काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज यावेळी मोदींनी व्यक्त केली. मोदींच्या या टीकेचा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि पवार कुटुंबाचे सदस्य अजित पवार यांनी प्रतिवाद केला आहे. एखादा व्यक्ती घराणेशाहीतून पुढे आला आणि त्याला लोकांनी निवडून दिले असेल तर त्याला घराणेशाही म्हणता येणार नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार यांच्या हस्ते मुंबईतील राष्ट्रवादी भवनात सोमवारी ध्वजारोहण पार पडले. यानंतर अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी त्यांनी मोदींनी केलेल्या वक्तव्यवार प्रतित्त्योर दिले आहे.

यावेळी अजित पवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केलेल्या घराणेशाहीच्या मुद्द्याविषयी विचारण्यात आले. त्यावर अजित पवार यांनी म्हटले की, घराणेशाही कोणीही आणू शकत नाही. जनतेने त्या लोकांना निवडून दिलं तर लोकशाहीत ते निवडून जाऊ शकतात. घराणेशाही संपवली पाहिजे, असे बोलले जाते. पण जनतेने निवडून दिलं तरच घराण्यातील लोक निवडून येतात. नेहरूंच्या पंतप्रधानांच्या कारकीर्दीनंतर इंदिरा गांधी यांनी देशाची सूत्रे हाती घेतली. इंदिरा गांधी यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्यानंतर राजीव गांधी पंतप्रधान होते. त्यांनी भारतात संगणक युग आणले, मिस्टर क्लीन अशी त्यांची प्रतिमा होती. घराणेशाही-घराणेशाही असं म्हटलं जातं. ज्यांच्यामध्ये कुवत नाही, ताकद नाही, कर्तृत्व नाही, नेतृत्त्व नाही, अशांना बळजबरीने पदावर बसलं तर त्याला घराणेशाही म्हणू शकता. पण एखाद्या घरामध्ये जन्माला आलेली पुढची पिढी ही कर्तृत्त्ववान असेल, त्यांच्या भागातील जनतेने त्यांना आमदार-खासदार केलं, तर त्याला घराणेशाही म्हणणे चुकीचे ठरेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

1 thought on “‘लोक निवडून देतात ती घराणेशाही कशी?’

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.