Sat. Jul 11th, 2020

आज दहावीचा निकाल कसा पाहाल?

दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दहावीच्या निकालाच्या तारकेबद्दल विविध तारखांच्या अफवा उठत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र त्यानंतर राज्य मंडळाने परिपत्रक काढून 8 जूनला निकाल जाहीर करणार असल्याचं सांगितलं.

कसा पाहाल निकाल online?

maharashtraeducation.com

mahresult.nic.in

hscresult.mkcl.org

या websites वर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहाता येईल.

त्यासाठी website वरील निकालाच्या लिंकवर क्लिक करावं.

दिलेल्या बॉक्समध्ये आपला आसन क्रमांक टाकावा.

तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

या निकालाची प्रिंट आऊटही काढता येईल

मोबाइलवरही पाहू शकता निकाल

SMS द्वारेही विद्यार्थ्यांना आपला निकाल समजू शकतो.

त्यासाठी आपला आसन क्रमांक लिहून 57766 या नंबरवर SMS पाठवावा.

 

विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या फोटोकॉपीसाठी 10 जूनपासून अर्ज करता येईल. तसंच परीक्षेत नापास झाल्यास किंवा grade सुधारण्यासाठी फेरपरीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्टमध्ये परीक्षा देता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *