Mon. Jul 22nd, 2019

सुरू झाले TikTok वर व्हायरल होण्याचं प्रशिक्षण देणारे क्लासेस!

0Shares

TikTok App सध्या प्रचंड लोकप्रिय आहे. आपले वेगवेगळे व्हिडिओ बनवून TikTok वर अपलोड करण्याची सध्या स्पर्धाच सुरू आहे. केवळ तरुण मुलं मुलीच नव्हे, तर गुन्हेगारही TikTok करू लागल्याच्या घटना काही दिवसांपासून प्रकाशात आल्या आहेत. कोर्टाने TikTok वरील बंदी मागे घेतल्यामुळे पुन्हा TikTok वर पुन्हा व्हिडिओंचा पाऊस पडू लागलाय. छोट्या छोट्या व्हिडिओंमधून लोक पैसेही कमावू लागले आहेत. आता तर आपले व्हिडिओ कसे व्हायरल करावेत, हे शिकवण्यासाठी खास प्रशिक्षण संस्थाही सुरू होऊ लागल्या आहेत.

 

TikTok वर व्हायरल व्हायचं प्रशिक्षण

भारतात ट्रेनिंग क्लासेस आणि वर्कशॉप्सद्वारे TikTok वर हिट व्हायचं ट्रेनिंग मिळणार आहे.

यात मेकअपपासून ते Usersना इन्फ्लुएंस करण्यापर्यंतचं प्रशिक्षण मिळणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे सर्व गुण या प्रशिक्षणादरम्यान शिकवले जाणार आहे.

सोशल मीडियावर झटपट व्हिडिओ तयार करणं, ते एडिट करणं आणि ते व्हायरल करणं याचं प्रशिक्षण देण्यात येईल.

तसंच सोशल मीडियावरील विविध ट्रेंड्सबद्दलही या प्रशिक्षण केंद्रात माहिती देण्यात येणार आहे.

सध्या दिल्लीमध्ये TikTok साठी ट्रेनिंग क्लासेस सुरू झाले आहेत.

‘सेलिब्रिटी फेस’ नावाची टीम हे क्लासेस घेत आहे.

साप्ताहिक वर्गासाठी दर महिन्याची फी 7000 रुपये आहे.

यात TikTok इन्फ्लुएंसर्स प्रशिक्षण देणार आहेत.

प्रत्येक session मध्ये विद्यार्थ्यांची संख्या 10 पर्यंतच मर्यादित राखण्यात येणार आहे.

या वर्गात आपल्याला थेअरी आणि प्रॅक्टिकल अशा दोन्ही प्रकारे प्रशिक्षण देण्यात येईल.

तसंच विद्यार्थ्यांना TikTok स्टार्ससह पोर्टफोलिओ शूट करण्याचीही संधी मिळणार आहे.

 

व्हायरल होण्याचा फायदा काय?

सोशल मीडियाचा वापर अनेक मोठ्या कंपन्या Brand Promotion साठी करतात.

ज्या users चे सोशल मिडियावर फॉलोअर्स मोठ्या प्रमाणावर आहेत, अशा usersना TikTok व्हिडिओमधून आपल्या products चं promotion करण्यासाठी पैसे दिले जातात. त्यामुळे व्हाययरल झाल्यामुळे तुम्ही TikTok stars बनवून पैसे कमावू शकतात.

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: