Wed. Jun 29th, 2022

वादळांना नावं कशी पडतात…

गुरू या ग्रहावर नेहमीच वादळ सुरू असते आणि त्या ग्रहावरचे वादळ हे न थांबणारे आहे. प्रत्येक ग्रहावर अनेक प्रकारची वादळे येत असतात. त्याप्रमाणेच पृथ्वीवरील अनेक प्रकारची वादळे येतात मनुष्य पृथ्वीवर राहतं असल्यानं मनुष्याला नाव हे सुचतातचं त्यामुळे या वादळांचे नामकरण केल्या जाते. पृथ्वीवर मनुष्य आणि प्राणी राहत असल्यानं या वादळाचा थेट परिणाम हा सर्व प्राणीमात्रांवर होतो. चला तर आज जाणून घेऊ या की वादळाचे नामकरण कसे होते.

उष्णकटिबंधीय सायक्लोन ही हवामानशास्त्रज्ञांद्वारे वापरली जाणारी सामान्य संज्ञा आहे. उष्णकटिबंधीय पाण्यावर उगम पावणारे ढग आणि झंझावात यांचं मिश्रण जेव्हा चक्राप्रमाणे फिरतं, त्याला आपण सायक्लोन म्हणतो, असं USच्या National Oceanic and Atmospheric Administrationचं म्हणणं आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाची जागतिक हवामान संघटना हे जगभरातल्या वादळांच्या नावाची यादी बनवत असते. टायफून, हैयान, हरिकेन ,कॅटरिना यांसारख्या अत्यंत धोकादायक वादळांची नावं बदलण्यात आली असून ज्या देशांमध्ये हरिकेन, टायफून, सायक्लोन वादळं येतात, त्या देशांकडून जागतिक बैठकीदरम्यान वादळांची नावं सुचवली जातात. “2000च्या दशकात बंगालचा उपसागर आणि अरबी समु्द्र यांत येणाऱ्या आठ देशांनी अशा नावांची शिफारस जागतिक हवामान संघटनेला केलं होतं,” असं भारतीय हवामान विभागातल्या एका वरिष्ठ शास्त्रज्ञानं बीबीसीला दिलेल्या मुलाखती सांगितलं होतं. या नावामधील 50 टक्के नावं आधीच वापरली गेली आहेत. देशातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावणार नाही, अशी आशयाचं नाव वादळाला देण्याचा संबंधित देश प्रयत्न करतात,” असं त्यांनी पुढे सांगितलं. भारतीय उपखंडात निर्माण होणाऱ्या वादळांना या भागातील देशांकडून नावं दिली जातात. पश्चिम किनारपट्टीवर आलेल्या वादळाळा म्यानमारनं ‘तौते’ हे नाव दिलं होतं. चक्रीवादळाला दिलेलं हे नाव एका सरड्याच्या प्रजातीचं आहे आणि हा सरडा प्रचंड आवाज करणारा आहे. GECKO वरून हे नाव देण्यात आलं आहे. सरड्याला तौत्के म्हटलं जातं, ज्याचा उच्चार तौते असा होतो. त्याचप्रमाणे, यापुढे जे वादळ निर्माण होईल, त्याला ‘यास’ असं नाव दिलं जाईल. ओमेन देशाने हे नाव दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.