बनावट रेमडेसिवीर कसे ओळखाल?

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांसाठी रेमडेसिवीर या इंजेक्शनची मागणी प्रचंड वाढलेली त्याचा काळाबाजार होत असल्याचे दिसून येत आहे. अशा गंभीर परिस्थितीतही बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन विकली जात असल्याचं समोर आलं आहे.

आयपीएस अधिकारी मोनिका भारद्वाज यांनी रेमडेसिवीरबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक ट्वीट केले आहे. रेमडेसिवीरच्या ओळखीसाठी त्याची तुम्हालाही मदत होईल.

 

बनावट रेमडेसिवीर कसे ओळखाल?

– १०० मिली. ची कुपी असते. बॉक्स आणि कुपीवर तसे स्पष्ट नमूद केलेले असते.
– सर्व इंजेक्शन २०२१ मध्ये बनले आहेत.
– इंजेक्शन फक्त पावडर स्थितीच मिळते.
– बॉक्सच्या मागे बारकोड असतो.
– इंजेक्शनच्या सर्व कुपींवर RxRemdesivir असे लिहलेले असते.
– खोट्या रेमडेसिवीरच्या बॉक्सवर पत्त्त्याचे स्पेलिंग चुकवलेले असते.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Exit mobile version