नवरात्री स्पेशल रेसिपी- कुल्फी
सध्या सगळीकडे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे.
नवरात्रोत्सवात अनेकजण 9 दिवस देवीची भक्तिभावाने पूजा करतात तसेच काहीजण नवरात्रीत नऊ दिवस उपवासही करतात मात्र या 9 दिवसांत रोज रोज एकसारखा फराळचं करावा लागतो.
पण आपल्याला जर उपवासात काहीतरी वेगळं आणि मजेदार खायला मिळाले तर भारीचं वाटेल ना? या गोष्टीचा विचारच कीती भारी आहे ना मग फक्त विचारच करु नका ही रेसिपी ही बनवा आणि तुमचा उपवास एन्जॉय करा.
साहित्य
- दूध – 250 मिली
- केशर – एक चुटकी
- वेलची पावडर – एक चुटकी
- ब्राउन साखर – 5 टेस्पून
- बादाम – 6-7 न.
- वरीचे पीठ – 1/2 टेस्पून
- पिवळा भोपळा / बाटली गोरड – 200 ग्रॅम
कृती
- एका कढईत भोपळा 12 मिनिटे वाफवून घ्या.
- एका टोपात दुध घाला. त्यात वरीचे तांदूळ तसेच ब्राऊन साखर घाला. नंतर त्यात केशर, वेलची पावडर, सुपारी घालून चांगले उकळवा. नंतर ते दूध थंड होण्यास ठेवणे.
- त्यानंतर वाफवलेला भोपळा आणि दुधाचे मिश्रण ब्लेंडरमध्ये बारीक करून घ्या.
- हे मिश्रण पुन्हा घट्ट होईपर्यंत शिजवावे. नंतर हे मिश्रण थंड होण्यास ठेवणे.
- मिश्रण थंड झाल्यावर एका साच्यात ओतणे. आणि फ्रीजरमध्ये 5 ते 6 तास ठेवणे.
- नंतर थंड कुल्फी सर्व्ह करा.
टीप: पीठ बनवण्यासाठी भात भिजवून तांदूळ पीठ घाला.