Tue. Aug 9th, 2022

… तरंच कोरोना संसर्ग टाळता येईल– डॉक्टरांचा सल्ला

मुंबई  : संपूर्ण देशभरात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक वेगाने पसरत आहे. यंदाचा हा विषाणू अतिशय शक्तीशाली असून अनेक लोक प्रभावित होऊ लागले आहेत. दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. त्यातच बर्याच लोकांना ताप, सर्दी, खोकला, श्वास घेता न येणं आणि अंगदुखी यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पहिल्या लाटेत ज्या रूग्णांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही त्या लोकांना दुसऱ्या लाटेत संसर्ग होऊ लागला आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्गापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचं पालन करणे गरजेचं आहे. यामुळे आपण कोरोनातून दूर ठेवू शकतो, असे तज्ज्ञ डॉक्टर सांगतायेत. कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. याकरता राज्यात पुऩ्हा एकदा संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी सामाजिक अंतर राखणे, शारीरिक स्वच्छता आणि चेहऱ्यावर मास्क लावून या आजाराशी लढा देता येऊ शकतो. घराबाहेर न पडणे या आजाराशी मुकाबला करण्यात मदत करतेय. म्हणूनच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी कोविड प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

डॉ. छाया वजा यांच्यानुसार , “कोविड-१९ लसीकरण अतिशय सुरक्षित असून कोरोना संसर्गाचा धोका कमी करते, असं अनेक क्लिनिकल टायल्सवरून समोर आले आहे. या लसीमुळे विषाणूंचा संसर्ग होण्याची शक्यता कमी होते. एखाद्याला लस घेतल्यानंतरही संसर्ग झाल्यास भविष्यात उद्भवणारी गुंतागुंत कमी होते. ही लस घेतल्याने शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. यामुळे कोरोना विषाणूपासून आपले सरंक्षण होते. वयोवृद्ध आणि १८ वर्षांवरील सर्वांना ही लस घेणं अनिवार्य करण्यात आले आहे. पण गर्भवती महिला आणि लहान मुलांना या लसीकरणातून वगळण्यात आले आहे. कोरोना लसीकरणामुळे आजाराचा संसर्ग झाल्यास रूग्णाला रूग्णालयात दाखल करून उपचार घेण्यापासून दूर ठेवता येऊ शकते.” डॉ. छाया पुढे म्हणाल्या की, “लसीचे डोस हे दोन टप्प्यात दिले जात आहेत. दुसरा डोस घेतल्यानंतर व्यक्तीच्या शरीरात आवश्यक अण्डीबॉडीज तयार होतात. ज्यामुळे कोरोना विषाणूंशी लढण्यास यामुळे मदत मिळते. लस घेतल्यानंतर तुम्हाला थकवा, डोकेदुखी, इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना, ताप, थंडी वाजणे किंवा लसीकरणानंतर शरीर दुखणे यासारखे दुष्परिणाम जाणवतील. पण घाबरून जाऊ नका. डॉक्टरांनी दिलेली औषधे घ्या. यामुळे तुम्ही लवकर बरे व्हालं. याशिवाय लसीबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मनात काही शंका असल्यास तातडीने डॉक्टरांशी चर्चा करा.”

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.