Sun. Oct 17th, 2021

अशा पद्धतीने करा लसीकरणासाठी नोंदणी!

केंद्र सरकारने १८ वर्षांवरील लोकांसाठी १ मे पासून लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली असून आजपासून लसीसाठी नोंदणी सुरु होणार आहे.१ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे कोरोना लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे. ही नोंदणी बुधवारी सायंकाळी ४ वाजल्यापासून सुरु होणार आहे.

कोरोना लस हवी असेल तर त्यासाठी तुमचे वय त्यामध्ये बसणे गरजेचे आहे. तसेच यासाठी www.cowin.gov.in किंवा को-विन अॅपद्वारे नोंदणी करता येणार आहे. यामध्ये तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर करावा लागणार आहे. रजिस्टर करताना तुमच्याकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्राव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र असणे गरजेचे आहे. त्यावरील आयडी नंबर आणि इतर माहिती तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.

जाणून घ्या कशी असेल नोंदणी प्रक्रिया
१. www.cowin.gov.in या अधिकृत साईटवर जा.
२. Register/ Sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करा.
३. तुम्हाला OTP येईल तो तेथे टाका आणि क्लिक करा.
४. Vaccine Registraction form भरा.
५. schedule appointment वर क्लिक करा.
६. पिन कोड टाका
७. सत्र निवडा(सकाळ किंवा दुपार)
८. लसीकरण केंद्र आणि तारीख निवडा.
९. Appointment book करून confirm करा.
१०. Appointment details चा मेसेज मोबाईलवर येईल.
११. हा मेसेज जपून ठेवा, लसीकरण केंद्रावर तुमचे ओळखपत्र आणि हा मेसेज दाखविल्यास लस देणे सोपे होईल.

संपादन: सिद्धी भरत पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *