Thu. May 6th, 2021

उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं…

सध्या उकाडा प्रचंड वाढत चालला आहे. दुपारी तर उन्हामुळे सर्वांनाच त्रास होतोय. त्यामुळेच अनेकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. उन्हाळ्यात उद्भवणाऱ्या समस्यांमध्ये पोटाचे विकार सर्वांधिक दिसून येतात. बहुतांश लोक उन्हाळ्यात पोटदुखीच्या त्रासाने हैराण झालेले असतात. अशावेळी उन्हाळ्यातील दिवसात पोटाशी संबंधित नेमके कोणकोणते त्रास होतात आणि त्याचा प्रतिबंध व उपचार कसा करावा, याबद्दल अधिक

जाणून घेऊया…

डॉ. रॉय पाटणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. सर्दी, खोकला आणि तापानंतर या दिवसांत सगळ्यात जास्त त्रास देते ते पोट. उन्हाळ्याच्या काळावधीत उच्च तापमान व्यक्तीच्या मनावरच नव्हेतर शरीरावरही परिणाम करतो. उष्णतेमुळे व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत जाते. त्यामुळे पोटासंबंधी विकार उद्भवू लागतात. पोटाचे आजार म्हणजेच पचनसंस्थेचे आजार. उन्हाळ्याच्या दिवसांत अधिक बळावतात. उन्हामुळे प्रचंड घाम येऊन शरीरातील पाणी निघून जात असल्याने अनेकदा पोटविकार होतात. याशिवाय अस्वच्छ अन्न आणि दूषित पाण्यामुळे ही समस्या उद्भवते. याव्यतिरिक्त ताप येणं, वेदना जाणवणं, थकवा, अशक्तपणा, पोटदुखी आणि अगदी डोकेदुखीच्या तक्रारीही उन्हाळ्याच्या काळात दिसून येतात.
उलट्या होणं, त्वचेवर लाल पुरळ उठणं, अँसिडिटी, छातीत जळजळ होणं, चक्कर येणे, अशक्तपणा, महिलांमध्ये युरीन इन्फेक्शन, डायरिया आणि ताप यांसारख्या समस्याही उन्हाळ्यात आढळून येतात.

उन्हाळ्यात अपचनाची समस्या टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी…

• पौष्टिक आहाराचे सेवन करावेत, फायबरयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा
• ताजे फळे, भाज्या, डाळी, सोयाबीन आणि शेंगदाणे खावेत.
• टोमॅटो, सफरचंद्र, नाशपाती, टरबूज, काकडी, गोड बटाटे आणि अननस आहारात असू द्या.
• उष्णतेमुळा घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते, म्हणून जास्तीत जास्त पाणी प्यावेत. पाणी न प्यायल्याने अतिसाराची समस्या उद्भवू शकते.
• मसालेदार, तळलेले आणि जंकफूडचे सेवन करणं टाळावेत, यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. पिझ्झा, चिप्स आणि बेकरी पदार्थ खाऊ नयेत.
• आतड्यामध्ये असणारे बॅक्टेरियासाठी प्रोबायोटिक्स अतिशय उपयुक्त ठरू शकते.
• रस्त्याच्या बाजुला उघड्यावर असलेले अन्न खाणे टाळा आणि शिळे अन्न खाऊ नका, कारण यामुळे विषबाधा होऊ शकते.
• दररोज व्यायाम करा आणि योगा, पोहणे, सायकलिंग, धावणे आणि अगदी एरोबिक्स देखील करा. नियमितपणे व्यायाम केल्यास आरोग्य सुदृढ राखण्यास मदत होते. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढू विविध आजारांना दूर ठेवता येऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *