Fri. Jun 21st, 2019

ठरलं! हृतिकचा Super30 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

86Shares

अभिनेता हृतिक रोशनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

जवळपास 2 वर्षांच्या ब्रेकनंतर ‘Super30’ या सिनेमातून हृतिक रोशन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मात्र या सिनेमाचे प्रदर्शन गेल्या वर्षभरापासून रखडले आहे. हा सिनेमा कंगना रणौतच्या ‘मणिकर्णिका’सोबत 25 जानेवारीला प्रदर्शित होणार होता.

मात्र गेल्या महिन्याभरात या सिनेमाच्या प्रदर्शनाबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे हृतिकच्या चाहत्यांना प्रतीक्षा करण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता.

अखेर ‘रिलायन्स एंटरटेनमेंट’ने ‘Super30’ च्या प्रदर्शनाबद्दल खुलासा केला आहे.

सिनेमाचे काही काम बाकी आहे त्यामुळे प्रदर्शनास दिरंगाई होत असल्याची माहिती रिलायन्स एंटरटेनमेंटकडून देण्यात आली आहे.

त्यामुळे हा सिनेमा आता 26 जुलै 2019 मध्ये प्रदर्शित होत आहे.

या सिनेमाचा दिग्दर्शक विकास बहलवर ‘मी टू’ मोहिमेअंतर्गत अनेक महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले होते.

विकासवरील आरोपानंतर हृतिकने त्याच्यासोबत काम न करण्याचा निर्णयही घेतला होता. त्यामुळे काही काळ सिनेमाचे शुटींग लांबले होते.

तसेच या सिनेमात अनेक नवीन दृश्यांचा ऐनवेळी समावेश करण्यात आला त्यामुळेही चित्रीकरणास विलंब झाला.

हा सिनेमा नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित होणार होता त्यानंतर निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलून ती 25 जानेवारी 2019 केली होती.

मात्र तोपर्यंतही सिनेमाचे काम पूर्ण न झाल्याने अखेर ‘Super30’ 26 जुलै 2019 या रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

 

86Shares

Leave a Reply

%d bloggers like this: