Tue. Jun 15th, 2021

अखेर दिलासा! निवडणुकीच्या कामातून शिक्षकांची सुटका

निवडणुकीच्या काळात शिक्षकांना विशेष ड्युटी करावी लागते. मात्र यावेळच्या निवडणुकीमध्ये राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. त्यामुळे या परीक्षेसाठी  नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावं, असा आदेश निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं आहे.

शिक्षकांच्या मागणीला यश-

राज्यात सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत.

या परीक्षा झाल्यावर पेपर तपासण्याचे काम शिक्षकांकडे आसतं.

तब्बल 50,000 पेक्षा अधिक शिक्षकांना निवडणुकीचं काम दिलं जाणार होतं.

दहावी आणि बारावीचे पेपर तपासणी आणि निकालासंदर्भातील कामात शिक्षक व्यस्त असतात.

याबरोबर निवडणुकीचं काम लावल्यास दहावी बारावीचे  निकाल रखडण्याची भीती होती.

त्यामुळे  निवडणुकीचे काम देऊ नये , अशी मागणी विविध शिक्षक संघटनांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

या मागणीला यश आले असून  परीक्षेसाठी  नियामक आणि परीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकांना निवडणूक कामातून वगळावे, असे आदेश  निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *