Mon. Jan 17th, 2022

आता विज्ञानाच्या पुस्तकात कोरोनावर धडा

कोरोना हे आता जागतिक संकट बनलं आहे. आता त्याचा धडाच पाठ्यपुस्तकात असणार आहे. या रोगाबद्दल बारावीच्या विज्ञान शाखेच्या जीव विज्ञान पुस्तकात माहिती देण्यात आली आहे. ‘कॉमन कोल्ड’ मध्ये कोरोना व्हायरस, त्याची लक्षणं आणि उपाय यांची माहिती देण्यात आलं आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सायन्सच्या बारावीच्या Physics च्या पुस्तकात आता कोरोनाविषयी माहिती दिली गेली आहे. या पुस्तकाच्या पान क्रमांक 166 वर यासंदर्भात लक्षणं आणि उपाय यांच्याबद्दल माहिती दिली आहे. तसंच हात स्वच्छ धुण्याची सूचनाही पुस्तकात देण्यात आली आहे.  

घसा खवखवणं, सर्दी, ताप, खोकला ही लक्षणं कोरोनामध्ये देण्यात आली असून हा आजार आठवडाभर राहतो असं पुस्तकात दिलंय. हात साबणाने धुवावेत. हे विषाणू हवेतून पसरतात तसंच संपर्कातूनही या व्हायरसचा प्रसार होतो, असं पुस्तकात दिलंय. डॉ. रमेश गुप्ता हे पुस्तकाचे लेखक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *