Fri. May 7th, 2021

बारावीच्या परीक्षांची प्रवेशपत्रे ३ एप्रिलपासून महाविद्यालयांना ऑनलाइन उपलब्ध होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार आहेत. यासंदर्भात राज्य मंडळाने परिपत्रक जारी केले आहे. ही प्रवेशपत्रे शनिवारी ३ एप्रिल पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. बारावीची अंतिम परीक्षा एप्रिल – मे २०२१ मध्ये होत आहे.

कनिष्ठ महाविद्यालयांनी www.mahahsscboard.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवरून कॉलेजच्या लॉगइनद्वारे प्रवेशपत्रे डाऊनलोड करावी. ३ एप्रिल २०२१ पासून ही प्रवेशपत्रे कॉलेजांना डाऊनलोड करता येणार आहेत. महाविद्यालयांनी बारावीची ऑनलाइन प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना द्यायची आहेत. यासाठी कोणतेही वेगळे शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येऊ नये,अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

प्रवेशपत्रे डाऊनलोड करताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास महाविद्यालयांनी विभागीय मंडळाशी संपर्क साधावा, असे आवाहन मंडळाने केले आहे. प्रवेशपत्रात विषय किंवा माध्यम बदल असेल तर त्या दुरुस्त्या महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत.प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव यासंदर्भातील दुरुस्त्या असतील तर महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर त्या दुरुस्त करून त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरीत पाठवायची आहे,अशा सूचनाही मंडळाने दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *