Tue. Jun 15th, 2021

12 वीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींचीच बाजी!

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला असून एकूण निकाल यंदा 85.80% इतका लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मात्र निकालाचा टक्का घसरला आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या निकालात 2.53% घसरण झाली आहे. गेल्यावर्षीही निकालात 1.09% घसरण झाली होती.

 

कोकणाचीच बाजी!

विभागवार निकालात यंदाही कोकण विभागाचा निकाल 93.23% लागला आहे.

सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला आहे. 82.51% इतका नागपूर विभागाचा निकाल लागला आहे.

मुंबई विभागाचा निकाल यंदा 83.85% लागला आहे.

विभागवार निकाल

कोकण – 93.23

पुणे – 87.88

अमरावती – 87.55

औरंगाबाद – 87.29

कोल्हापूर – 87.12

लातूर – 86.08

मुंबई – 83.85

नाशिक – 84.77

नागपूर – 82.51

 

पुन्हा एकदा मुलींची बाजी

यंदाही बारावीच्या निकालांत मुलींनीच बाजी मारली आहे.

राज्यभरातून यंदा बारावीसाठी 6 लाख 30 हजार 254 विद्यार्थिनींनी परीक्षा दिली होती.

त्यापैकी 90.25 % विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

एकूण 5 लाख 68 हजार 780 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत.

मुलांचा एकूण निकाल 82.40% लागला आहे. 7 लाख 91 हजार 682 विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 52 हजार 279 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *