नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे नुकसान – रघुराम राजन

रिझर्व बँक ऑफ इंडिया सारख्या संस्थांमध्ये सरकारने हस्तक्षेप करु नये, नाहीतर त्याचा परिणाम देशातील आणि परदेशी गुंतवणुकीवर होईल असे सांगत नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशाचे नुकसान झाले असे देखील आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन त्यांनी स्पष्ट केले.
रघुराम राजन यांच्या या वक्तव्यामुळे आता नोटाबंदी आणि जीएसटी यांचा अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले का यावर अर्थतज्ञांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. दिल्लातील एका मुलाखतीत रघुराम राजन बोलत होते.